शेतकरी फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

Centre decided that farmers will not just be ‘Ann Daatas’ but also ‘Urja Daatas’ – Nitin Gadkari

शेतकरी फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता झाला पाहिजे – नितीन गडकरी

Union Minister Nitin Gadkari
File Photo
सांगली: शेतकरी हा फक्त अन्नदाताच नव्हे तर ऊर्जादाता झाला पाहिजे असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. बग्यास पासून तयार होणारं, बिटूमिन हे यापुढे रस्तेनिर्मितीसाठी वापरलं जाणार आहे.

ऊसापासून फक्त साखर बनण्याऐवजी इथनॉलही बनवायला हवं, असं सांगून नितीन गडकरी यांनी लॉजेस्टिक पार्क, सॅटेलाईट पोर्ट, प्रिकुलिंग सेंटर, शीतगृह, विमानतळ, आयात-निर्यात व्यवस्था एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं सरकारच धोरण असल्याची घोषणा त्यांनी केली.

सांगली जिल्ह्यात यासाठी रांजणी इथे उपलब्ध जागेबाबत राज्य आणि केंद्र सरकारात सामंजस्य करार करता येईल असं ते म्हणाले.

सांगली जिल्ह्यातल्या दोन महामार्गांच लोकार्पण आज गडकरी यांच्या हस्ते झालं, यावेळी ते बोलत होते. सांगली जिल्ह्यातुन जाणाऱ्या जत ते सांगोला आणि बोरगाव ते वाटंबरे या ९६किलोमीटर रस्त्यांचा समावेश असलेला हा एकूण २ हजार ३३४ कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.
सांगली ते पेठ या रस्त्याच्या कामाची सुरुवात टेंडर काढून येत्या ३ ते ४ महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पायाभूत सुविधांबरोबरच जलसंर्वधनावर लक्ष्य केंद्रीत करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
Hadapsar News Bureau.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *