Festival of plays on the occasion of Tripurari Poornima..!!
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने नाटकांची पर्वणी..!!
ललित कला केंद्राकडून ललित पौर्णिमेचे आयोजन
पुणे : सावित्री बाई फुले पुणे विदयापीठाच्या ललित कला केंद्र गुरूकुल विभागातर्फे दरवर्षी दिवाळीनंतर येणा-या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘ललित पैर्णिमा’ महोत्सव साजरा केला जातो.
या महोत्सवात ललित कला केंद्र गुरूकुल विभागाच्या माजी विदयार्थ्यांच्या गायन, वादन, नर्तन आणि नाटयप्रयोगांचे रात्रभर सारदरीकरण केले जाते. या वर्षीचा ‘ललित पोर्णिमा’ महोत्सव शनिवार दि. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ९.०० पासून दुस-या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत साजरा होणार आहे.
या महोत्सवात मराठी नाटक ‘सीता स्वयंवर’ मधील पदांचे गायन, शास्त्रीय गायन, स्वर-ताल वाद्यमेळ, ‘मी वस्त्रवती’ ही नृत्य-संरचना, लावणी नृत्य, ‘अकादमी समोर अहवाल’ आणि ‘आळशी अत्तरवाल्याची गोष्ट’ ही एकल नाटये तर ‘हात्तमालाच्या पल्याड’ व ‘संगीत कमली की सत्त्वपरीक्षा अर्थात हयो रिश्ता क्या कहेलाता है?’ या नाटयप्रयोगांचे सादरीकरण केले जाणार आहेत.
सर्व कार्यक्रम ललित कला केंद्र परिसरातील ‘अंगणमंच’ येथे सादर होणार आहे. मुख्य म्हणजे हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून नाटक प्रेमींसाठी ही मोठी पर्वणी असणार आहे असे ललित कला केंद्राचे विभाग प्रमुख डॉ.प्रवीण भोळे यांनी सांगितले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने नाटकांची पर्वणी..!!”