List of 1,630 candidates announced under the final phase of MHADA’s direct service recruitment process
म्हाडाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अंतिम टप्प्याअंतर्गत १ हजार ६३० उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई : म्हाडा अर्थात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अंतिम टप्प्या अंतर्गत ५६५ जागांसाठी निवड झालेल्या १ हजार ६३० उमेदवारांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर झाली आहे.
या उमेदवारांना त्यांच्या कागदपत्र पडताळणीची तारीख, वेळ आणि स्थळ स्वतंत्रपणे पत्राद्वारे कळवलं जाईल. ज्या उमेदवारांचं अर्जावरचं छायाचित्र आणि परिक्षा केंद्रावर काढण्यात आलेलं छायाचित्र जुळत नाही, ज्यांचे लॉग डिटेल्स शंका घेण्याजोगे आहेत, ज्या उमेदवारांचं परिक्षा केंद्रावरचं वर्तन आक्षेपार्ह होतं, अशा उमेदवारांचे निकाल राखून ठेवले आहेत.
याबाबत योग्य यंत्रणेमार्फत चौकशी करून पात्र उमेदवारांचे निकाल घोषित केले जातील अथवा दोषी उमेद्वारांविरोधात कारवाई केली जाईल असं म्हाडानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.