लोकसभेत वित्त विधेयक २०२३ गोंधळात मंजूर

Hadapsar News, Hadapsar Latest News, हडपसर मराठी बातम्या

Finance Bill 2023-24 passed in Lok Sabha amid the din

लोकसभेत वित्त विधेयक २०२३ गोंधळात मंजूर

राज्यसभेचे कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूबParliament House New Delhi संसद भवन नवी दिल्ली हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

नवी दिल्ली : लोकसभेत आज आवाजी मतदानानं वित्त विधेयक २०२३ मंजूर करण्यात आलं. याबरोबरच लोकसभेतली अर्थसंकल्पाविषयीची प्रक्रीया आज पूर्ण झाली. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे, त्यामुळं या मुद्द्यावर अभ्यास करण्यासाठी केंद्रीय वित्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सरकार स्थापन करणार असल्याचं आश्वासन यावेळी बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं.

ही समिती आर्थिक ताळमेळ साधतानाच कर्मचाऱ्यांच्या गरजांकडे लक्ष देईल. समितीच्या शिफारशी केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही स्वीकारता येतील, असं त्या म्हणाल्या. वित्त विधेयक मंजूर होत असताना विरोधकांची घोषणाबाजी सुरूच असल्यानं लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

काँग्रेस, द्रमुक, जेडी(यू) आणि इतर सदस्य वेलमध्ये होते. गदारोळ सुरूच राहिल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केले.

सकाळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू झालं तेव्हा सलग ९व्या दिवशी राहुल गांधी यांचं भारतीय लोकशाहीवर केलेले वक्तव्य आणि अदानी समुहाच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची विरोधकांची मागणी
या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांनी गोंधळ घातला. त्यामुळं सुरुवातीला लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत आणि राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला अडीच वाजेपर्यंत आणि नंतर साडे ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेत, आज सकाळी सभागृहाची बैठक झाली, तेव्हा अध्यक्ष जगदीप धनखर यांनी अदानी समूहावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीच्या स्थापनेवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी मांडलेल्या स्थगन नोटिसांना नकार दिला. त्यानंतर कोषागार आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळादरम्यान अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २.३० पर्यंत तहकूब केले.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *