फिनटेक कंपन्यांनी व्यवस्थापन आणि जोखीम नियमन याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास RBI Governor Shri Shaktikanta Das हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

RBI Governor Shaktikanta Das advises fintech companies to pay special attention to risk management and regulation

फिनटेक कंपन्यांनी व्यवस्थापन आणि जोखीम नियमन याकडे विशेष लक्ष देण्याची रिझर्व बँकेचे गवर्नर शक्तीकांत दास यांची सूचना

मुंबई : फिनटेक म्हणजे आर्थिक क्षेत्राशी संबधित तंत्रज्ञान कंपन्यांनी व्यवस्थापन, व्यावसायिक आचरण, डेटा सुरक्षा, ग्राहककेंद्री धोरण, नियामक चौकट आणि जोखीम नियमन याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना रिझर्व बँकेचे गवर्नर शक्तीकांत दास यांनी केली आहे.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास RBI Governor Shri Shaktikanta Das हडपसर मराठी बातम्या Hadapsar News
File Photo

कृषी तंत्रज्ञान कंपन्या आणि आर्थिक क्षेत्रातल्या तंत्रज्ञान कंपन्यांसाठी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. भविष्याबद्द्ल आशादायी असलेल्या भारतात फिनटेक कंपन्या आणि स्टर्टअप्स यांना महत्व आहे.

श्री. दास म्हणाले, फिनटेक उपक्रम आणि स्टार्ट अप्स हे महत्त्वाकांक्षी भारताचे महत्त्वाचे भाग आहेत. ते डिजिटल नवकल्पना आणि वित्तीय सेवांच्या वितरणाच्या नाविन्यपूर्ण माध्यमांद्वारे आर्थिक व्यवस्थेत परिवर्तनाची भूमिका बजावत आहेत, असेही ते म्हणाले.

जबाबदार नवोन्मेषासाठी अनुकूल धोरणात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी गव्हर्नरांनी आरबीआयच्या सक्रिय आणि सहाय्यक भूमिकेवर प्रकाश टाकला.

या कंपन्यांमुळे डिजिटल तसेच इतर नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर आर्थिक सेवा देण्यासाठी पूर्ण क्षमतेने करता येतो. या क्षेत्रातल्या नवनवीन संशोधनासाठी भारतीय रिझर्व बॅकेची धोरणे अनुकूल आहेत असं त्यांनी यावेळी नमूद केलं. यावेळी सहभागी कंपन्यांनी फिनटेक संबधी धोरण अधिक सुविहित होण्यासाठी काही सूचना केल्या.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “फिनटेक कंपन्यांनी व्यवस्थापन आणि जोखीम नियमन याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना”

  1. Howdy! I just woud like to give you a huge thumbs up foor your great info you’ve got here on this post. I’ll be coming back to your site for more soon. is there a special schedule for posting ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *