नाशिक जिल्ह्यात इगतपुरीजवळ जिंदाल रसायन कारखान्यात आग

Fire Accident Image

Fire at Jindal chemical factory near Igatpuri in Nashik district

नाशिक जिल्ह्यात इगतपुरीजवळ जिंदाल रसायन कारखान्यात आग

नाशिक: नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातल्या मुंढे गावाजवळच्या जिंदाल पॉलिफिल्म या कंपनीत आज सकाळी स्फोट होऊन आग लागली. सुमारे पाच एकर क्षेत्रात असलेल्या या कंपनीच्या परिसरात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.

Fire Accident Image
Image by Pxfule.com

आतापर्यंत १५ गंभीर जखमींना नाशिकच्या सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कसोळे यांनी दिली.

आज सकाळी रासायनिक टाकीच्या बॉयलरचा स्फोट झाल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात आग लागली. या घटनेचे वृत्त कळताच नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी तसेच अन्य उच्च पदस्थ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून नाशिक महापालिकेच्या अग्निशामक दलाचे जवानही आग विसरण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

शासकीय आणि खासगी रुग्णवाहिका देखील रवाना झाल्या आहेत. ज्या युनिटमध्ये स्फोट झाला तेथे ५० ते ६० कामगार काम करीत होते, असा अंदाज आहे.

दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना ही घटना कळल्यानंतर आपला सिल्लोड दौरा रद्द करून त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

केंद्रीय मंत्री भारती पवार याही घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

बचाव कार्यात कोणतीही कसर राहणार नाही, देवळाली इथल्या हवाई दलाशी संपर्क साधण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *