पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर

First Lata Dinanath Mangeshkar Award announced to Prime Minister Narendra Modi

पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर

मुंबई : मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.First Lata Dinanath Mangeshkar Award announced to Prime Minister Narendra Modi हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News, Hadapsar News

देशासाठी पथदर्शक, नेत्रदीपक, मोलाचं योगदान देणाऱ्या एका व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार देण्याचा निर्णय प्रतिष्ठाननं अलीकडेच घेतला होता.

या वर्षी येत्या २४ तारखेला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा ८० स्मृतीदिन येत असल्यानं पहिला पुरस्कार यावेळी द्यायचं प्रतिष्ठाननं ठरवलं होतं. आज हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

याबरोबरच भारतीय संगीतातल्या योगदानाबद्दल गायक राहुल देशपांडे यांना मास्टर दीनानाथ पुरस्कार जाहीर केला आहे.  चित्रपट क्षेत्रातल्या योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख आणि अभिनेता जॉकी श्रॉफ यांना विशेष पुरस्कार, तर समाजसेवेसाठी मुंबईच्या डबेवाल्यांना आनंदमयी पुरस्कार, जाहीर झाले आहेत.

पुरस्कारांचं वितरण येत्या २४ तारखेला मुंबईत षण्मुखानंद सभागृहात होणार आहे.

Hadapsar News Bureau.

Spread the love

One Comment on “पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *