अमेरिकेतील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांशी पुणे विद्यापीठाचे पाच सामंजस्य करार

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Five MoUs of Savitribai Phule Pune University with reputed universities and educational institutions in America

अमेरिकेतील नामांकित विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पाच सामंजस्य करार

कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांची माहिती: शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या दृष्टीने विद्यापीठाचे महत्वाचे पाऊल

पुणे : नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आणखी एक पुढाकार घेतला आहे. अमेरिकेतील नामांकित विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांसोबत विद्यापीठाने पाच सामंजस्य करार केले आहे.Savitribai Phule Pune University

या कराराच्या माध्यमातून भविष्यात विद्यार्थ्यांना अनेक नवीन शैक्षणिक संधी उपलब्ध होतील याबाबतचा विश्वास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी व्यक्त केला आहे.

या कराराच्या माध्यमातून भविष्यात अनेक विद्यार्थी प्राध्यापक आदान प्रदान, द्विलक्षी अभ्यासक्रम, कार्यशाळा, परिषद, संशोधन प्रकल्प अशा अनेक गोष्टी करू शकतो. अनेक परदेशी विद्यार्थ्यांना भारतीय कला, संगीत, योग आणि आयुर्वेद या गोष्टी शिकण्यात रस आहे, परंतु त्यांना चांगले शिक्षक उपलब्ध नाहीत. या कराराच्या माध्यमातून आपण परदेशी विद्यार्थ्यांसाठी असे अभ्यासक्रम सुरू करू शकतो.

 

– डॉ.कारभारी काळे, कुलगुरू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या शिष्टमंडळाने ४ ते १८ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ‘ येथे भेट दिली. डॉ.कारभारी काळे व रूसा समन्वयक तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ.आदित्य अभ्यंकर यांचा या शिष्टमंडळात सहभाग होता.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे खुली झाली आहेत. याच गोष्टीला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. नामांकित विद्यापीठाशी सबंध प्रस्थपित करण्याचे आदेश राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानंतर्गत (रुसा २.०) देण्यात आले आहेत. या भेटीदरम्यान या शिष्टमंडळाने तेथील १३ विविध विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. यावेळी अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांशी संवादही साधण्यात आला.

विद्यापीठाने केलेले सामंजस्य करार

सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क

या विद्यापीठात भारतीय केंद्राची स्थापना करण्याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. अशा प्रकारे करार करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ देशातील पाहिले विद्यापीठ ठरले आहे.

स्टुडंट्स सपोर्टिंग इस्राएलने सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क

या कराराच्या माध्यमातून ब्राँनक्स कम्युनिटी कॉलेज, बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क रिमोट सेन्सिग अर्थ सिस्टीम या संलग्न संस्थांसोबतही संबंध प्रास्थपित झाले आहेत.

ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी

या कराराच्या माध्यमातून जैव विज्ञानशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रम अधिक सक्षम करण्यात येणार आहे तसेच यामध्ये संशोधन करणाऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे.

केलिकॉर्निया युनिव्हर्सिटी

या सामंजस्य करारात उद्योजकता विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान त्याबरोबरच अन्य तत्सम गोष्टींबाबत काम करण्यात येणार आहे.

स्टुडंट्स सपोर्टिंग इस्राएल, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क

२१ सप्टेंबर रोजी मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

या शिष्टमंडळाने यावेळी १३ विविध विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या. यामध्ये ब्रॉनक्स कम्युनिटी कॉलेज- न्यूयॉर्क, बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज – न्युयॉर्क, न्युयॉर्क हार्बर स्कूल, बिलियन ऑईस्टर प्रोजेक्ट – न्युयॉर्क, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क रिमोट सेंसिंग अर्थ सिस्टीम, ड्रेक्सेल युनिव्हर्सिटी- फिकडेन्फिया, कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी – लॉस एंजेलिस, कॅलिफोर्निया विद्यापीठ – लॉस एंजेलिस, लोयोला मेरीमाऊंट युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी – बर्कले, कॉम्पुटर हिस्टरी म्युझियम – पालो अल्टो, आयबीएम डेमो लॅबोरेटरी आदींचा समावेश होता. यांच्यासोबत चार सामंजस्य करार यावेळी करण्यात आले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *