संविधानाचे पालन करून सुजाण नागरिक बनावे 

Preamble to the Constitution

Follow the constitution and become an informed citizen.

संविधानाचे पालन करून सुजाण नागरिक बनावे

-प्राचार्य दत्तात्रय जाधव

साधना विद्यालयात संविधान दिन साजरा

हडपसर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशभक्तांनी रक्त सांडले.आपल्या प्राणांचे बलिदान दिले.त्यामुळे आज भारत देशात स्वातंत्र्याची भव्य इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचे लिखाण केले त्या संविधानाप्रमाणे देशाचा कारभार चालू आहे.Preamble to the Constitution

जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना म्हणून भारतीय राज्यघटनेचा गौरव केला जातो.घटनेने सर्वांना स्वातंत्र्य,समता व बंधूता ,मुलभूत हक्क व कर्तव्यांची अनमोल देणगी दिली आहे.पुढील शंभर वर्षांचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले.त्यामुळे सर्वांनी संविधानाचे पालन करून सुजाण नागरिक बनावे .साधना विद्यालयात आयोजित संविधान दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रतिमापूजन करण्यात आले.त्यानंतर सहशिक्षक अनिल वाव्हळ यांनी भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.शिक्षक मनोगतात ज्ञानेश्वर सरोदे यांनी भारतीय राज्यघटना व निर्मितीची पार्श्वभूमी सांगितली.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव ,उपमुख्याध्यापिका योजना निकम, पर्यवेक्षक शिवाजी मोहिते, सांस्कृतिक विभागाचे सर्व सदस्य ,विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली जायले यानी केले.सूत्रसंचालन संगिता रूपनवर यांनी केले.तर आभार वर्षा खोमणे यांनी मानले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *