Centre to roll out new integrated Food Security Scheme from 1st January 2023
१ जानेवारी पासून देशभरातल्या ८१ कोटी नागरिकांना मिळणार मोफत अन्नधान्य
नवी दिल्ली : एकात्मिक अन्न सुरक्षा” ही नवीन योजना १ जानेवारी पासून लागू होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार, नवीन योजनेद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०२३ अंतर्गत ८१ कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान केलं जाणार आहे.
या योजनेमुळे कायद्याची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणीदेखील निश्चित होणार असून मोफत अन्नधान्य एकाच वेळी देशभरात “वन नेशन वन रेशन कार्ड” अंतर्गत पोर्टेबिलिटीची समान अंमलबजावणी सुनिश्चित होईल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत अन्न सुरक्षेबाबत एकसमानता आणि स्पष्टता आणणं हा नवीन योजनेचा उद्देश आहे.
योजनेअंतर्गत, केंद्र सरकार अंत्योदय अन्न योजना कुटुंबं आणि प्राधान्य कुटुंब व्यक्तींसह सर्व राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य प्रदान केलं जाणार आहे. देशभरातील पाच लाखांहून अधिक स्वस्त धान्य दुकानांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे अन्नधान्य पुरवलं जाईल. केंद्र सरकार एका वर्षात दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त अन्न-अनुदानाचा भार उचलणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com