Forensic investigation is mandatory for all offences punishable by more than six years
सहा वर्षांहून अधिक शिक्षा दिलेल्या सर्व गुन्ह्यांकरिता न्यायवैद्यक तपास अनिवार्य
नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे दिल्ली पोलीस मुख्यालयाला भेट दिली आणि अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर विस्तृत बैठक घेतली.
दोषसिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि न्यायवैद्यक विज्ञान तपासणीसह फौजदारी न्याय प्रणाली एकात्मिक करण्यासाठी दिल्लीतील 6 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असलेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये न्यायवैद्यक तपासणी अनिवार्य करावी असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीत दिले. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये कायदेशीर तपासणीनंतरच पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले पाहिजे असे शहा यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशाला अंमली पदार्थांच्या शापातून मुक्त करण्यासाठी कटिबद्ध असून दिल्लीत अंमली पदार्थांवर कारवाई करण्यासाठी विस्तृत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.
महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले पाहिजे असे सांगून त्यांना अधिक व्यावसायिक आणि संवेदनशील दृष्टिकोनासह सुरक्षित वातावरण प्रदान करण्याच्या प्रयत्नांना गती देण्यात यावी असे निर्देशही केंद्रीय गृहमंत्र्यांनी या बैठकीत दिले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com