Former US President Donald Trump is guilty of sexual abuse of a woman
महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप दोषी
राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
ठोठावला 50 लाख डॉलर्सचा दंड
मॅनहॅटन: जीन कॅरोल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयानं लैंगिक शोषण प्रकरणी ट्रम्प यांना दोषी ठरवलं आहे. मात्र, बलात्काराचे आरोप फेटाळले आहेत.
मॅनहॅटन फेडरल कोर्टात दोन आठवडे चाललेल्या सुनावणीला ट्रंप उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी आपल्यावरील सर्व आरोपही फेटाळून लावले.
पुढच्या वर्षी अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. तज्ज्ञांच्या मते ट्रंप यांच्या ही निवडणूक लढविण्याच्या मनसुब्याला या निर्णयामुळे खीळ बसू शकते.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांना एका मासिकाच्या स्तंभलेखिकेच्या लैंगिक शोषण प्रकरणात प्रथमच दोषी धरण्यात आले आहे. गेले दोन आठवडे चाललेल्या एका दिवाणी खटल्याची सुनावणी आणि तीन तास चर्चा केल्यानंतर न्यायमंडळाने ट्रंप यांना या प्रकरणात लैंगिक छळ आणि मानहानीसाठी जबाबदार धरलं.
मॅनहॅटनमधील एका डिपार्टमेंटल स्टोअरच्या ड्रेसिंग रूममध्ये 1996 मध्ये ट्रम्प यांनी कॅरोल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप कॅरोल यांनी केला होता. कॅरोल यांनी 2019 मध्ये एका पुस्तकात या घटनेचा सर्वात आधी उल्लेख केला होता.
हा निकाल देताना न्यायालयानं म्हटलं आहे की, 1990 च्या दशकात एका मासिकाच्या लेखिका ई. जीन कॅरोल यांच्या लैंगिक शोषणप्रकरणी ट्रम्प दोषी आहेत. ट्रम्प यांनी अनेकदा कॅरोल यांनाला खोटं बोलून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलं आणि कॅरोलला 5 लाख डॉलर्सची नुकसान भरपाई दिली.
दरम्यान, न्यायालयानं ट्रम्प यांना लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्काराचा आरोप न्यायालयानं फेटाळला आहे. डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये कॅरोलवर बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयानं ट्रम्प यांना दोषी ठरवलेलं नाही. ज्युरीनं कॅरोलचा बलात्काराचा आरोप नाकारला, कारण हा खटला फौजदारी न्यायालयात नव्हे तर दिवाणी न्यायालयासमोर आणला गेला होता.
शिक्षेपोटी ट्रंप यांनी स्तंभलेखिकेला पन्नास लाख डॉलर्स भरपाई द्यावी असा आदेश न्यायमंडळानं दिला. 1995 मध्ये ही घटना घडली होती.
माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला सार्वजनिकरित्या अपमानास्पद आणि बदनामीचं कारण म्हटलं आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील या प्रकरणाची सुनावणी 25 एप्रिलपासून सुरू झाली होती आणि आता नऊ सदस्यांच्या ज्युरीनं ट्रम्प यांना लैंगिक शोषणप्रकरणी दोषी ठरवलं आहे.
या खटल्यातील आरोप करणारी महिला कोण आहे याची आपल्याला कोणतीही कल्पना नाही असा दावा डोनल्ड ट्रंप यांनी केला होता आणि न्यायमंडळाचा निर्णय अवमानकारक असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयाविरुद्ध अपील करणार असल्याचं ट्रंप यांच्या वकिलांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com