Free Covid 19 booster dose for all citizens above 18 years
१८ वर्षांवरच्या सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा मोफत
नवी दिल्ली: येत्या १५ तारखेपासून पुढच्या ७५ दिवसांच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळाच्या कालावधीत १८ वर्षावरच्या सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा विनामूल्य दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना ही माहिती दिली.
कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी लसीकरण हे प्रभावी माध्यम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. एका ट्विटमध्ये ते म्हणाले, आजच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे भारताचे लसीकरण कव्हरेज वाढेल आणि एक निरोगी राष्ट्र निर्माण होईल.
अनेक केंद्रीय मंत्र्यांनी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लाभार्थ्यांना खबरदारीचा डोस मोफत देण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. आज एका ट्विटमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मोदी सरकारने महामारीच्या काळात मोफत कोविड लस देऊन करोडो भारतीयांना संरक्षणात्मक कवच प्रदान करण्याचा प्रयत्न केला.
या निर्णयाचे कौतुक करून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले, आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत या महिन्याच्या १५ पासून ७५ दिवसांची मोफत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ते म्हणाले, लाभार्थ्यांना शासकीय केंद्रांवर लसीकरणाचे डोस मोफत दिले जातील.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “१८ वर्षांवरच्या सर्व नागरिकांना कोविड १९ ची वर्धक मात्रा मोफत”