नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षणाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

Commissionerate of Skill Development

Call for applications for free skill development training

नि:शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षणाकरीता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियानांतर्गत आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Commissionerate of Skill Development

या योजनेंतर्गत देण्यात येणारे कौशल्य विकास प्रशिक्षण हे नि:शुल्क असून प्रशिक्षणाअंती उमेदवारांना शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षणांच्या माध्यमातून रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उमेदवारांना उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील १५ ते ४५ वयोगटातील अधिकाधिक उमेदवारांनी कौशल्य विकास प्रशिक्षणाकरिता

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeYZvWQ9yqQesXUKr76jNK5eE0IswG6TLgACD4puRPSyVw4zQ/viewform

या लिंकवर अर्ज करुन या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. याबाबत अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सा.बा मोहिते यांनी केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *