Meeting in New Delhi regarding norms for free use of green energy by all
हरित उर्जेचा सर्वांना मुक्तपणे वापर करता यावा यासाठीच्या नियमांसंदर्भात नवी दिल्लीत बैठक
नवी दिल्ली : हरित उर्जेचा सर्वांना मुक्तपणे वापर करता यावा यासाठीच्या नियमांसंदर्भात आज नवी दिल्लीत बैठक झाली. ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या पार्श्वभूमीवर, ४५ टक्के उत्सर्जन कमी करण्याचं लक्ष्य राष्ट्रीय स्तरावर निर्धारित केलं आहे. त्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. उद्योग जगतानं हरित उर्जेसाठी लक्ष्य निर्धारित करावं आणि त्याचे लाभ घ्यावेत असं आवाहन सिंग यांनी यावेळी केलं.
या प्रसंगी बोलताना सिंह यांनी उद्योग क्षेत्रातील नेत्यांना हरित मार्गाकडे वळण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्याचे आणि वाजवी दरात हरित उर्जा मिळवण्यासाठी ग्रीन एनर्जी ओपन ऍक्सेस नियमांच्या तरतुदींचा लाभ घेण्याचे तसेच हरित आणि शाश्वत वातावरणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
“ग्रीन एनर्जी ओपन ऍक्सेस नियम, 2022 हे हरित उपक्रमांचा अवलंब करण्यासाठी तसेच राष्ट्रीय योगदान 2030 च्या उद्दिष्टानुसार उत्सर्जनात 45% घट करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यामुळे विजेच्या किंमती लक्षणीयरीत्या कमी करण्यात मदत होईल. तुम्ही सर्वांनी नवीन नियमांचा लाभ घ्यावा आणि भावी पिढ्यांसाठी एक हरित ग्रह मागे ठेवण्याच्या दूरदृष्टीसह काम करावे असे मला वाटते ” असे केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणाले. “
वाजवी दरात हरित ऊर्जा मिळावी याकरता या तरतुदी केल्या आहेत. यामुळे हरित आणि अधिक शाश्वत पर्यावरणाला हातभार लागेल असं ते म्हणाले. टाकावू ते हरित ऊर्जेची निर्मिती, खरेदी आणि वापर यांना प्रोत्साहन देणं हा याचा उद्देश आहे. नियमांनुसार, ग्राहकांना वीज वितरण कंपन्यांकडून हरित उर्जेची मागणी करण्याचा अधिकार आहे. या कंपन्या पात्र ग्राहकांना हरित वीज खरेदी आणि पुरवठा करण्यास बांधील असतील असं त्यांनी सांगितलं.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com