कार्ला एकविरा येथे सीकेपी समाजाचा `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा

Ekvira Devi Karla एकविरा देवी कार्ला हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

`Ek Divas Kayastha” function of CKP Samaj at Karla Ekwira

२६ नोव्हेंबर रोजी कार्ला एकविरा येथे सीकेपी समाजाचा `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा

पुणे: चांद्रसेनिय कायस्थ प्रभु तथा सीकेपी (CKP) समाजातर्फ़े कार्ला येथील एकविरा गडावर साजरा होणारा `एक दिवस कायस्थांचा’ सोहळा २६ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून यावर्षी होणारा सोहळा भव्य प्रमाणात साजरा होणार असल्याची माहिती उत्सवाचे संयोजक तुषार राजे, रघुवीर देशमुख व राजेश देशपांडे यांनी दिली.

गेली पाच वर्षे एकविरा गडावर `एक दिवस कायस्थांचा’ हा उत्सव साजरा केला जातो. उत्सवासाठी देशाच्या विविध भागातून शेकडो सीकेपी बांधव येत असतात. त्या दिवशी संपूर्ण दिवस विविध धार्मिक कार्यव्रâम करीत देवीला साकडे घालण्यात येते.Ekvira Devi Karla
एकविरा देवी कार्ला
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

यावर्षीही सकाळपासूनच अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने एकविरा देवीचा महाअभिषेक, पायरी पूजन, देवीचा होम, देवीचा गोंधळ, भक्तीसंगीताचा कार्यक्रम सीकेपी ज्ञातीत काम करणार्‍या मान्यवरांचे सत्कार, महाआरती इत्यांदी विविध कार्यव्रâमांचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे कार्ला एकविरा येथे येण्यासाठी दादर, बोरीवली, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, पुणे इत्यांदी ठिकाणांहून खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

यंदा होणारा सोहळा नेत्रदिपक सोहळा होणार असल्याने जास्तीत जास्त भक्तांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन कायस्थांची श्री एकविरा विश्वस्त संस्थेतर्फे करण्यात आले आहे. उत्सवासाठी बिपीन देशमुख, निलेश गुप्ते, मंदार कुळकर्णी, अंजली प्रधान इत्यांदी मेहनत घेत आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *