यापुढे आर्थिक क्षेत्रातले पेचप्रसंग आभासी चलनामुळे उद्भवण्याची शक्यता

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास Reserve Bank of India Governor Shaktikant Das Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

Future financial crisis likely to arise due to virtual currency – Shaktikanta Das

यापुढे आर्थिक क्षेत्रातले पेचप्रसंग आभासी चलनामुळे उद्भवण्याची शक्यता

– शक्तिकांत दास

मुंबई : यापुढे आर्थिक क्षेत्रातले पेचप्रसंग आभासी चलनामुळे उद्भवण्याची शक्यता असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. बँका, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातल्या संस्थांच्या परिषदेला आज ते संबोधित करत होते.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास Reserve Bank of India Governor Shaktikant Das Hadapsar News हडपसर मराठी बातम्या
File Photo

आभासी चलनाची वैशिष्ट्यं आणि त्यातली जोखीम याबद्दल दास यांनी यावेळा माहिती दिली. सध्या जगात सुमारे १४० अब्ज डॉलर किमतीचे व्यवहार आभासी चलनाद्वारे होत असून त्यामुळे मूल्यांकनात सुमारे ४० अब्ज डॉलरची घट होत आहे असं त्यांनी सांगितलं.

त्यांनी असेही नमूद केले की जगभरातील बहुतांश केंद्रीय बँकर्स क्रिप्टोकरन्सीपासून सावध आहेत. आरबीआय गव्हर्नर म्हणाले, क्रिप्टोकरन्सीबाबत तीन मुख्य चिंता आहेत. त्यांनी स्पष्ट केले की प्रथम, खाजगी क्रिप्टोचे मूळ ‘सिस्टम तोडणे’ आहे आणि त्यांचा नियमन केलेल्या आर्थिक जगावर विश्वास नाही. दुसरे म्हणजे, ते म्हणाले की क्रिप्टोकरन्सीला कोणताही मूलभूत आधार नाही आणि ते कोणत्या सार्वजनिक हिताची किंवा उद्देशाने सेवा करतात याबद्दल देखील स्पष्टता नाही. तिसरे म्हणजे, ही 100 टक्के सट्टा क्रियाकलाप आहे म्हणून ती एक धोकादायक मालमत्ता बनते, असेही ते म्हणाले.

भारतीय रिझर्व बँकेने सुरु केलेला इ रुपी हे भविष्यातलं चलन असेल असं ते म्हणाले. इ रुपी मुळे भविष्यात अनेक प्रकारचे व्यवहार सुलभ होतील असं दास यांनी सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *