Special Lecture on ‘G-20: Cities of the Future’
‘जी – २०: भविष्यातील शहरांसाठी ‘ या विषयावर विशेष व्याख्यान
‘जी – २०’ च्या अनुषंगाने जन भागीदारी कार्यक्रम : साडेसात लाख विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राचार्यांसाठी व्याख्यानाचे आयोजन
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या जी – २० परिषदेतील कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘जन भागीदारी ‘ या कार्यक्रमांतर्गत ‘भविष्यातील शहरांसाठी ‘ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या आर्थिक घडामोडी या विभागातील संयुक्त सचिव सॉलोमन अरोकिराज हे आपल्या स्वागतपर भाषणात जी-२० परिषदेविषयी विचार मांडणार आहेत. तसेच केंद्रीय वित्त मंत्रालयातील सल्लागार विरेंदर सिंग ‘भारताच्या नेतृत्वाखालील जी २० ‘ या विषयावर व्याख्यान देतील.
सुरत येथील महापालिका आयुक्त शालिनी अगरवाल या भविष्यातील शहरे या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. यावेळी आशियायी विकास बँकेचे शहर तज्ज्ञ संजय ग्रोवर यांची उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.
या व्याख्यानाला विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार आणि अधिष्ठाता डॉ.विजय खरे यांचीही उपस्थिती असणार आहे.
डॉ.खरे म्हणाले, या व्याख्यानाच्या निमित्ताने अनेक महत्त्वाच्या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच प्राचार्य व प्राध्यापकांना या व्याख्यानाचा लाभ ऑनलाईन पद्धतीने घेता येणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com