The G20 chairmanship is an opportunity to introduce India to the world
जी 20 अध्यक्षपद ही जगाला भारताची ओळख करून देण्याची संधी
– डॉ. एस. जयशंकर
भारत आज समस्येवर उपाय शोधून देणारा देश आहे
पुणे: भारताला मिळालेलं जी 20 अध्यक्षपद हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भारताकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा असलेल्या जगाला भारताची ओळख करून देण्याची संधी असल्याचं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज पुण्यात व्यक्त केलं.
भारताचे जी-20 अध्यक्षपद ही जगासाठी आव्हानात्मक असलेल्या काळात भारताला मिळालेली एक विशेष जबाबदारी आहे, असे मत, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. आज जगाला भेडसावणाऱ्या आणि भविष्यातील समस्यांवर आज भारत जगाला उपाय शोधून देणारा देश ठरला आहे, असेही त्यांनी सांगितले.
आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, यावर भर देत, ते म्हणाले की भारत एक सभ्य संस्कृतीचा वारसा असलेला देश असून या काळात अशा नव्या युगाचे नेतृत्व करत आहोत जिथे विविधतेचा आदर ठेवला जातो. एक असा देश, ज्याची ऊर्जा, उत्साह आणि सृजनशीलता दिवसेंदिवस वाढते आणि त्याच्या भवितव्याविषयी संपूर्ण जगाला विशेष रस आहे.
G 20 च्या अध्यक्षपदाविषयी बोलताना डॉ. जयशंकर म्हणाले की G-20 हे सर्वात महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे आणि या अध्यक्षपदाच्या एक वर्षाच्या कारकिर्दीत भारत जे काही करेल, त्यामुळे जगाच्या राजकारणात मोठा फरक पडू शकेल.
सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे आयोजित ‘फेस्टिव्हल ऑफ थिंकर्स समिट’ या दोन दिवसांच्या परिषदेत ते बोलत होते. आगामी काळात डिजिटल तंत्रज्ञान जागतिक बदलामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तंत्रज्ञानातल्या गुंतागुंतीमुळे भविष्यात माहिती सुरक्षा हे महत्त्वाचं आव्हान असेल, असं ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com