G20 परिषदेच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात विविध उपक्रमांचं आयोजन

G20 summit 2023 G20 परिषद २०२३ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Organized various activities in Pune on the background of G20 conference meetings

G20 परिषदेच्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात विविध उपक्रमांचं आयोजन

पुणे: पुण्यात १६ आणि १७ जानेवारीला होत असलेल्या G20 देशांच्या प्रतिनिधींच्या बैठकीच्या निमित्ताने पुणे लोहगांव विमानतळावर महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृती आणि परंपरेचं दर्शन पाहुण्यांना घडणार आहे.G20 summit 2023 G20 परिषद २०२३ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

परदेशी पाहुण्यांचं स्वागत खास मराठमोळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. G20 बैठकांच्या पार्श्वभूमीवर कामांची पाहणी कऱण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं असल्याचं विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितलं.

G20 परिषदेच्या निमित्तानं ऐतिहासिक शनिवार वाड्यालाही नवीन झळाळी प्राप्त होत आहे. वीस देशांचे प्रतिनिधी या कालावधीत पुणे शहर आणि परिसरातील काही ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देणार आहेत. त्यात शनिवार वाड्याचाही समावेश असल्यानं त्या परिसरातील स्वच्छतेच्या कामांना गती मिळाली आहे. आवश्यकता भासेल तिथे शनिवार वाड्याची डागडुजी केली जात असून लाईट अँड साउंड शो देखील नव्यानं तयार केला जात आहे.

दरम्यान G20 बैठकांच्या अनुषंगानं पुणे महापालिकेच्या वतीने येत्या रविवारी सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळी सात वाजता महापालिकेच्या मुख्यालयापासून सुरू होणारी ही फेरी जंगली महाराज रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्तामार्गे पुन्हा महापालिकेत येईल. यामध्ये जवळपास पंधराशे सायकलपटू सहभाग घेतील असा अंदाज आहे.

याबरोबरच १२ जानेवारी रोजी शनिवारवाडा ते पुणे विद्यापीठ दरम्यान दुचाकी फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. यात जवळपास ७०० जण सहभागी होतील असं महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाचे अधीक्षक अभियंता सुधीर कदम यांनी सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *