GDP growth rate likely to exceed 7 percent
जीडीपी वाढीचा दर ७ टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता
जीडीपी वाढीचा दर ७ टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचं रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मत
नवी दिल्ली : 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होईल अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. दिल्लीत आज एका कार्यक्रमात ते बोलत होते.
रिझर्व बँकेचं नियमितपणे आर्थिक परिस्थितीवर बारीक लक्ष आहे, असं त्यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं कार्यक्रमात बोलतांना दास म्हणाले की, गेल्या वर्षभरातला जीडीपी वाढीचा दर ७ टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली.
कृषी क्षेत्राची उत्तम कामगिरी, आणि मोसमी पाऊस चांगला होण्याची शक्यता तसंच सेवा क्षेत्राची कामगिरी या आधारावर जीडीपी वाढीचा दर ही उंची गाठेल असा विश्वास आपल्याला वाटतो असं ते म्हणाले.
आरबीआय गव्हर्नरने एप्रिलमध्ये म्हटले होते की, २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढ सुमारे ६.५ टक्के असू शकते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ ७.८ टक्के, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढ ५.९ टक्के असू शकते.
सध्या भारताची अर्थव्यवस्था अशा वेळी विकसित होत आहे, जेव्हा पाश्चिमात्य देशात मंदी येण्याची शक्यता आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, ज्यांचा अंदाज ७ टक्क्यांहून अधिक आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com