Give preference to local candidates in jobs – Raj Thackeray
नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्या – राज ठाकरे
पुणे : नोकऱ्यांमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या आपल्या भूमिकेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुनरुच्चार केला.
ते आज पुण्यात जाहीर सभेत बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा आणावा, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठीही कायदा करावा तसंच औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं, अशी मागणी त्यांनी केली.
औरंगाबादमध्ये दहा दिवसांतून एकदा पाणी येतं. तसंच राज्यातल्या विविध शहरांच्या नागरी समस्या, ऊसाचा प्रश्न याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधलं.
मशिदींवरचे भोंगे काढण्याच्या भूमिकेचाही ठाकरे यांनी पुनरुच्चार केला. राज्यात सत्ताधाऱ्यांनी नामांतराच्या मुद्यांसह विविध विषयांचं निवडणुकीसाठी राजकारण केलं.एमआयएमला मोठं करण्याचं राजकारण करण्यात आलं, अशी टीकाही ठाकरे यांनी यावेळी केली.
हडपसर न्युज ब्युरो