‘Global Antibiotic Awareness Week’ by the Department of Microbiology
सूक्ष्मजीव विभागातर्फे ‘जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह’
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सूक्ष्मजीव विभागातर्फे १८ ते २४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत “जागतिक प्रतिजैविक जागरूकता सप्ताह” (WAAW) चे आयोजन केले होते. हा जागतिक आरोग्य संघटना आणि “इंडियन इनिशिएटिव्ह फॉर मॅनेजमेंट ऑफ अँटीबायोटिक रेझिस्टन्स” चा उपक्रम आहे.
जागतिक प्रतिजैविक प्रतिकाराबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि औषध-प्रतिरोधक संसर्गाचा पुढील उदय आणि प्रसार टाळण्यासाठी संशोधक, सामान्य जनता, आरोग्य कर्मचारी आणि धोरण कर्त्यांना माहिती देण्यासाठी विभागाने विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
पदवीधर, पदव्युत्तर आणि संशोधक विद्यार्थ्यांसाठी त्यांचे वैज्ञानिक ज्ञान अधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच विज्ञान विषयक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, येथील प्रा. अर्जुन काक्राणी, चंदीगड येथील पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था (पीजीआयएमईआर) मधील डॉ. नीलम तनेजा, राजस्थान केंद्रीय विद्यापीठातील डॉ. विश्वनाथ तिवारी, अजमेर आणि तमिळनाडूतील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ. रमेश नचिमुथू यांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.
या विभागाने ९ वी वर्गासाठी विद्यापीठ कॅम्पसमधील शाळेत विविध उपक्रमही राबवले होते. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, स्किट, प्रात्यक्षिके, काही खेळ असे विविध उपक्रम सादर करण्यात आले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com