India will take over the chairmanship of the Global Partnership on Artificial Intelligence, GPAI, from France
भारत स्वीकारणार फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद
नवी दिल्ली : भारत, आज फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI (Global Partnership on Artificial Intelligence) वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद स्वीकारणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर टोकियो इथे होणाऱ्या GPAI बैठकीत फ्रान्सकडून अध्यक्षपदाचा प्रतिकात्मक ताबा घेतील. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचा संघ असलेल्या G२० चं अध्यक्षपद स्वीकारल्या पाठोपाठ ही एक महत्वाची घटना आहे.
भारत 2020 मध्ये GPAI मध्ये संस्थापक सदस्य म्हणून सामील झाला. 2035 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 967 अब्ज अमेरिकन डॉलर्सची भर पडेल अशी अपेक्षा आहे. 2025 पर्यंत भारताच्या जीडीपीमध्ये 450 ते 500 अब्ज अमेरिकन डॉलर्सची भर पडेल, जी देशाच्या 5 ट्रिलियन डॉलरच्या GDP उद्दिष्टाच्या 10 टक्के असेल.
GPAI हा जबाबदार आणि मानव-केंद्रित विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI च्या वापरासाठी समर्थन देणारा एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. GPAI हा यूएस, यूके, युरोपेना युनियन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, मेक्सिको, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरसह २५ सदस्य देशांचा उपक्रम आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com