मोदी सरकारच्या धोरणांमुळे भारतावर मंदीचं सावट नसल्यानं उद्योजकांना गुंतवणुकीसाठी उत्तम काळ

Devendra Fadnavis. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Good time for entrepreneurs to invest as there is no recession in India due to Modi government’s policies

मोदी सरकारच्या धोरणांमुळे भारतावर मंदीचं सावट नसल्यानं उद्योजकांना गुंतवणुकीसाठी उत्तम काळ

– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News
File Photo

औरंगाबाद : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीं यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारच्या धोरणांमुळेच भारतावर मंदीचं सावट नाही अणि उद्योजकांना गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी केलं. ते आज औरंगाबादमधे आयोजित अ‌ॅडव्हांटेज महाराष्ट्र एक्सपोच्या समारोप समारंभात बोलत होते. मराठवाडा आणि विदर्भातल्या उद्योजकांना दिल्या जाणाऱ्या वीज अनुदानाची पुनर्रचना करण्याचं आश्वासन फडणवीस यांनी उद्योजकांना यावेळी दिलं.

आगामी दोन वर्षात शेतकऱ्यांना सौर उर्जेवर स्वयंपूर्ण करणार असल्याचं सांगत, यामुळे मराठवाडा, विदर्भातल्या उद्योगांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग हा मराठवाड्यासाठी महत्त्वाचा आहे. येणाऱ्या सहा महिन्यात हा मार्ग मुंबईला जोडला जाईल. नागपूर-गोवा महामार्ग हा देखील मराठवाड्यासाठी समृद्धी आणणार आहे. याचं नाव नाव नागपूर-गोवा महामार्ग जरी असलं तरी मराठवाड्यातील चार ते पाच जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे.

हा केवळ महामार्ग नसून औद्योगिक मार्गिका असल्याचं त्यांनी सांगितलं. ऑरिक सिटी हे उद्योगांचं भविष्य असून औरंगाबाद आणि जालन्यातले उद्योग येत्या सहा महिन्यात जवाहरलाल नेहरू बंदराच्या माध्यमातून जगाशी जोडले जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाविषयी सरकार गंभीर असून यासंदर्भात सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मजबूत असल्याचं फडणवीस यांनी सकाळी बातमीदारांशी बोलताना सांगितलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *