Goshalas are invited to apply for subsidy under Govardhan Govansh Seva Kendra Yojana
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत अनुदानासाठी गोशाळांना अर्ज करण्याचे आवाहन
प्रत्येक तालुक्यामधून एका गोशाळेस अनुदान देण्यात येणार
पुणे : जिल्ह्यात सन २०२३ – २४ मध्ये सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यामधून एका गोशाळेस अनुदान देण्यात येणार असून त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्ताव १९ जुलैपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेअंतर्गत गोशाळेकडे सांभाळ करण्यात येत असणारे पशुधन विचारात घेवून एकरकमी १५ लक्ष ते २५ लक्ष रुपये मर्यादेत अनुदान देय असणार आहे. योजनेचा मुलभूत उद्देश, देय अनुदान व अर्जाचा विहीत नमुना व अर्ज करण्याची पद्धत याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना संबंधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती कार्यालय यांचेकडे उपलब्ध आहे.
निकषात पात्र असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील इच्छुक गोशाळा संस्थांनी त्यांच्या तालुक्यातील पंचायत समिती येथे संपर्क साधून प्रस्ताव दाखल करावेत, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “गोवर्धन गोवंश सेवा अनुदानासाठी गोशाळांना अर्ज करण्याचे आवाहन”