कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याचे राज्य सरकारचे आदेश

Maharashtra Corona Virus Update हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

The state government orders an increase in the number of tests in districts where corona outbreaks are on the rise

कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याचे राज्य सरकारचे आदेश

मुंबई : रुग्णांची संख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या वाढविण्याचं आदेश राज्य सरकारनं दिले आहेत.Maharashtra Corona Virus Update हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे या जिल्ह्यांमध्ये हे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांनी दिली. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. या जिल्ह्यांमध्ये चाचण्यांच्या तुलनेत रुग्णांना कोरोनाचं निदान होण्याचं प्रमाण अधिक असलं तरी फार कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागतंय.

रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांपैकी कुणाचंही आजारपण गंभीर झालेलं नाही. त्यामुळं काळजीचा विषय नसल्याचं ते म्हणाले. राज्यात मास्क वापरण्याची सक्ती केलेली नसली तरी लोकांनी मास्कचा अवश्य वापर करावा यासाठी सूचना करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आल्याचंही ते म्हणाले.

राज्यात कोरोनाच्या १ हजार ३६ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आज कोरोनाच्या १ हजार ३६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

राज्यात सध्या ७ हजार ४२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

One Comment on “कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या जिल्ह्यांमध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्याचे राज्य सरकारचे आदेश”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *