Approval of the State Government to fill up the vacant posts of Principals and Professors
प्राचार्य आणि प्राध्यापकांची रिक्त पद भरायला राज्य सरकारची मंजुरी
कोल्हापुर : राज्यातल्या सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या २ हजार ७२ जागांच्या भरतीचा आदेश काढला असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती जपण्यासह रोजगारनिर्मितीसाठी शाहू मिलच्या १२ एकर हेरिटेज जमिनीमध्ये भव्य स्मारक, तर उर्वरित २४ एकरमध्ये एखादी टेक्स्टाइल मिल अथवा गारमेंट पार्क असा उद्योग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर सुरू करण्याचा विचार असून त्याबाबतचा प्रस्ताव वस्त्रोद्योग विभागाचे सचिव तयार करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com