Government’s floor test in the Assembly tomorrow
विधानसभेत उद्या सरकारची बहुमत चाचणी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांनी अध्यक्षांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला आणि त्यांचं अभिनंदन केलं. राज्याच्या विकासाच्या गतीची चाकं या काळात गतीमान होतील अशी आशा पवार यांनी व्यक्त केली.
काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी अध्यक्षांचं अभिनंदन केलं. राज्यपालांचा रामशास्त्री बाणा आता जागा झाला म्हणून ही निवडणूक झाल्याचं ते म्हणाले.
उद्या बहुमत प्रस्तावावर मतदान होईल, असंही त्यांनी सांगितलं. अध्यक्षांचं अभिनंदन करताना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी शिवसेनेचा पक्षादेश काही ३९ सदस्यांनी पाळला नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. त्यांचा आणि आपला विधानसभेचा कार्यकाळ किती असेल अशी शंका जनतेला आहे, असं प्रभु म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com