Government’s top priority to ensure basic amenities for every citizen: PM Modi
प्रत्येक नागरिकासाठी मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य : पंतप्रधान मोदी
कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात आणि रस्त्यांची कोंडी कमी करण्यात मेट्रोचं महत्त्वाचं योगदान
कोची: प्रत्येक नागरिकासाठी मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे आणि आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे हे त्यांच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. ते म्हणाले, ‘आझादी का अमृत कल’ दरम्यान भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पावर लोकांनी काम करण्याची गरज आहे.
सब का साथ, सब का विकास, सब का विश्वास आणि सब का प्रयास या मंत्राचा अवलंब करून सरकार संकल्पांचे रूपांतर सिद्धीमध्ये करत असल्याचे श्री मोदींनी निरीक्षण केले.
केरळमधील गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दोन लाख पक्की घरे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी १,३०,००० घरे पूर्ण झाली आहेत, असे मोदी म्हणाले.
मेट्रो यंत्रणेमुळे देशात चांगलं वातावरण निर्माण झालं असून, कार्बन फूटप्रिंट कमी करण्यात आणि रस्त्यांची कोंडी कमी करण्यात मेट्रोचं योगदान आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
ते आज कोची इथं कोची मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी आणि भारतीय रेल्वेच्या अनेक प्रकल्पांंचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. मेट्रोला शहरी वाहतूक व्यवस्थेचा भाग बनवण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या असून, गेल्या आठ वर्षांत 500 किलो मीटरपेक्षा जास्त नवीन मेट्रो रेल्वे मार्ग तयार करण्यात आले आहेत, तर देशात 1000 किलो मीटरपेक्षा जास्त मेट्रोचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोचीमधील युनिफाइड मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट अथॉरिटीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारणार असून, कक्कनड इथला इन्फोपार्कशी जोडणारा कोची मेट्रोचा दुसरा टप्पा व्यावसायिकांसाठी मोठं वरदान ठरेल.
ते म्हणाले की अशा प्रकल्पांमुळे राहणीमान सुलभ आणि व्यवसाय करणे सुलभ होईल. महत्त्वाची रेल्वे स्थानकं विमानतळांशी जोडणाऱ्या सुविधांसह विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितल. पेट्टा ते एसएन जंक्शनपर्यंत कोची मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातल्या विस्ताराचं प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं. त्याआधी प्रधानमंत्र्यांनी आदि शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेल्या कलाडी इथं आदि शंकराचार्यांचं दर्शन घेतलं.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com