Governor directs ruling alliance to prove majority in Maharashtra Assembly
महाराष्ट्र विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे सत्ताधारी आघाडीला निर्देश
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य शासनाला दिले असून त्याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
शिवसेनेचे विधीमंडळ पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी याचिका दाखल केली असून, त्यावर तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयाला केली. अपवादात्मक स्थिती लक्षात घेता, संध्याकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे.
दरम्यान भाजपाला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे हेच घेतील, असं त्यांच्यासोबतचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं, तर आपण आपल्या समर्थक आमदारांसोबत आज संध्याकाळपर्यंत मुंबईत परत येणार असल्याचं शिंदे यांनी जाहीर केलं आहे.
शिंदे यांनी आसामच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५० लाख रुपयांची देणगी दिल्याची माहिती केसरकर यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली, आणि राज्यातल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली. त्यावर विधानसभेत उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाण्याचे निर्देश राज्यपालांनी सरकारला दिले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com