कोळशाअभावी वीजटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी – माधव भांडारी

The government should give the reason for the shortage of electricity due to lack of coal – Madhav Bhandari

कोळशाअभावी वीजटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी – माधव भांडारी

मुंबई : वीजटंचाईमुळे हैराण झालेल्या शेतकरी आणि सामान्य जनतेची सहानुभूती मिळविण्याकरिता कोळसाटंचाईचे खोटे कारण पुढे केले जात आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव

Electricity Image हडपसर मराठी बातम्या Hadapsar News, Hadapsar Latest News.
Image by Pixabay.com

भांडारी यांनी काल केला.

राज्यातील कोणतेही वीजनिर्मिती केंद्र कोळशाअभावी बंद नसल्याचं वीज मंडळाच्या तपशिलावरून स्पष्ट दिसत आहे.

ढिसाळ कारभार आणि कमाल मागणीच्या वेळी पुरेशी वीजनिर्मिती करण्यातल्या नियोजनाचा अभाव हीच कारणे राज्यातल्या वीजटंचाईला कारणीभूत आहेत.

खाजगी क्षेत्राकडून महागडी वीज खरेदी करून दलालीतली टक्केवारी घेण्यासाठीत हा कृत्रिम वीजटंचाईचा घाट घातला जात असल्याचं भांडारी म्हणाले.
कोळशाअभावी वीजटंचाई झाल्याचे कारण देणाऱ्या सरकारने तफावतीची टक्केवारी जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी केली.

हडपसर न्युज ब्युरो (Hadapsar News Bureau)

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *