Government under Shri Narendra Modi launches country’s biggest ever Quiz Contest Sabka Vikas Mahaquiz
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारद्वारे देशातील सर्वात मोठी प्रश्नमंजुषा स्पर्धा सबका विकास महाप्रश्नमंजुषा स्पर्धेचा प्रारंभ
नवी दिल्ली : भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरी करत असताना, सरकारने सहभागात्मक प्रशासन आणि योजना आणि कार्यक्रम राबविताना नागरिकांसह सहभागी होण्यासाठी प्रयत्नांना गती दिली आहे. या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याच्या पद्धतीचा एक भाग म्हणून, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत MyGov सबका विकास महाप्रश्नमंजुषा मालिका आयोजित करत आहे, जी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या संदर्भात MyGov ने लोकांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे आणि नव भारताबद्दलचे त्यांचे ज्ञान आजमावले जाईल.
ही प्रश्नमंजुषा 14 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आली आहे. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाचे प्रतीक आहेत आणि सरकार समाजातील गरीब, उपेक्षित आणि असुरक्षित घटकांच्या सेवेसाठी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहे.
पहिली प्रश्नमंजुषा म्हणजे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) आहे.
ही प्रश्नमंजुषा सबका विकास महाप्रश्नमंजुषा मालिकेचा एक भाग आहे ज्यामध्ये विविध संकल्पनांवर वेगवेगळ्या प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू केल्या जातील. प्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजना प्रश्नमंजुषेचा प्रारंभ 14 एप्रिल 2022 रोजी करण्यात आला आहे आणि 28 एप्रिल 2022, रात्री 11:30 (IST) पर्यंत ती सुरू असेल. 300 सेकंदात 20 प्रश्नांची उत्तरे देणारी ही कालबद्ध प्रश्नमंजुषा आहे. प्रश्नमंजुषा 12 भाषांमध्ये उपलब्ध असेल – इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू. प्रत्येक प्रश्नमंजूषेत जास्तीत जास्त 1,000 सर्वाधिक गुण मिळविणारे सहभागी विजेते म्हणून निवडले जातील. निवडक विजेत्यांना प्रत्येकी 2,000/- रुपये दिले जातील.
प्रश्नमंजुषा http://mygov.in/mahaquiz वर सोडवता येईल.
Hadapsar News Bureau.