Great achievement of Sadhana Vidyalaya in SSC examination.
एस.एस.सी.परीक्षेत साधना विद्यालयाचे उत्तुंग यश.
हडपसर: कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाईन /ऑफलाइन अशा संमिश्र पद्धतीने सुरू होत्या. विद्यार्थी शाळेपासून दूर होते.
ऑनलाइन शिक्षण जरी सुरू असले तरी प्रत्यक्ष शाळा,शिक्षक यांच्यापासून विद्यार्थी दुरावले गेले होते.अशा परिस्थितीतही साधना विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एस.एस.सी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विद्यालयाचा निकाल 90.22 % इतका लागला.
रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात पिसाळ अनुज संजय हा शेकडा 96.60 गुण प्राप्त करून प्रथम आला. सुर्यवंशी प्रणव भीमराव हा शेकडा 96.40 गुण मिळवून द्वितीय तर नेवसे अनुराग विकास व ढवाळ कार्तिक प्रविण या विद्यार्थ्यांनी शेकडा 95.60 गुण मिळवून तृतीय क्रमांका पटकावला.
विद्यालयातील 176 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळाले तर प्रथम श्रेणीत 206 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन दादा तुपे पाटील, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य दिलीप आबा तुपे, अरविंद रामभाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी, सहविभागीय अधिकारी शंकर पवार, साधना विद्यालय व आर. आर. शिंदे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य ,आजीव सभासद दत्तात्रय जाधव,माजी प्राचार्य विजय शितोळे,आजीव सभासद लालासाहेब खलाटे,पर्यवेक्षक दिलीप क्षीरसागर,प्रल्हाद पवार, शिवाजी मोहिते ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,पालक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हडपसर न्युज ब्युरो (hadapsarinfomedia@gmail.com)