सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Groundbreaking ceremony of planned building of Savitribai Phule Pune University sub-centre

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर येथील उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन  दिनांक ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकासमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.Savitribai Phule Pune University

या कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, आमदार संग्राम जगताप, निलेश लंके, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, आयोजन समिती अध्यक्ष राजेश पांडे, अहमदनर उपकेंद्राचे संचालक डॉ. नंदकुमार सोमवंशी, बाबुर्डी घुमट येथील सरपंच नमिता पंचमुख व उपसरपंच तानाजी परभाणे तसेच आयोजन समिती सदस्य व समन्वय समिती सदस्य उपस्थित राहणार आहेत.

अहमदनगर मधील बाबुर्डी घुमट येथे ही इमारत प्रस्तावित असून विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी हे उपकेंद्र बांधण्यात येत आहे. यामध्ये परीक्षा, पात्रता, प्रवेश आदींमधील तांत्रिक बाबी या उपकेंद्राच्या माध्यमातून सोडविता येतील.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. नंदकुमार सोमवंशी म्हणाले, शासनाकडून विद्यापीठाला एकूण ८३ एकर जागा मिळाली आहे. सुरुवातीला दहा हजार चौरस फुटाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी साधारण तीन कोटी खर्च अपेक्षित आहे.

प्रशासकीय कामकाजसोबत येथे काही कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तसेच अंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरू करण्याचाही आमचा प्रयत्न आहे. या नवीन इमारतीत ग्रंथालय, कॉम्पुटर लॅब आणि वर्गखोल्या देखील असतील असेही डॉ.सोमवंशी यांनी सांगितले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *