GST Revenue collection for April 2022 highest ever at Rs 1.68 lakh crore
एप्रिल 2022 मध्ये 1.68 लाख कोटींचे आतापर्यंतचे उच्चांकी जीएसटी महसूल संकलन
नवी दिल्ली : एप्रिल 2022 मध्ये एकत्रित जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,67,540 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 33,159 कोटी, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 41,793 कोटी, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 81,939 कोटी (माल आयातीवर संकलित केलेल्या रु. 36,705 कोटींसह) आणि उपकर 10,649 कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या रु. 857 कोटींसह).यांचा समावेश आहे.
एप्रिल 2022 मध्ये झालेले सकल जीएसटी संकलन हे आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी महसूल संकलन आहे. त्या आधीच्या महिन्यात नोंदवण्यात आलेल्या 1,42,095 कोटी रुपये जीएसटी संकलनाच्या तुलनेत एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलन 25,000 हजार कोटी रुपयांनी अधिक आहे.
सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला 33,423 कोटी रुपये आणि सीजीएसटीला 26962 कोटी रुपये चुकते केले आहेत.
नियमित समझोत्यानंतर एप्रिल 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 66,582 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 68,755 कोटी रुपये आहे.
एप्रिल 2022 चा जीएसटी महसूल हा मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 20% जास्त आहे.या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 30% अधिक नोंदवण्यात आला. आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 17% अधिक आहे.
सकल जीएसटी संकलनाने प्रथमच 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.मार्च 2022 मध्ये निर्माण एकूण ई-वे देयकांची संख्या 7.7 कोटी होती, जी फेब्रुवारी 2022 मध्ये निर्माण झालेल्या 6.8 कोटी ई-वे देयकांपेक्षा 13% ने अधिक आहे,ही वाढ व्यावसायिक व्यवहार वेगाने पूर्वपदावर येत असल्याचे प्रतिबिंबित करते.
एप्रिल 2021. मध्ये दाखल केलेल्या एकूण 92 लाख विवरणपत्रांच्या तुलनेत. एप्रिल 2022 मध्ये, जीएसटीआर -3बी मध्ये 1.06 कोटी जीएसटी विवरणपत्र भरण्यात आली त्यापैकी 97 लाख विवरणपत्र मार्च 2022 या महिन्याशी संबंधित आहेत.
हडपसर न्युज ब्युरो