Sugarcane Struggle Committee’s demand to get a guaranteed price of 3500 rupees for the sale of sugar
साखर विक्रीसाठी साडेतीनहजार रुपये हमीभाव मिळावा अशी ऊसदर संघर्ष समितीची मागणी
पंढरपूर: साखर विक्रीसाठी सध्याचा ३ हजार १०० रुपयांच्या किमान हमीभावात वाढ करून तो ३ हजार ५०० रुपये करावा, अशी मागणी ऊस दर संघर्ष समितीनं केली आहे. काल पंढरपूर इथं ऊस परिषद झाली. या परिषदेत हा ठराव झाला.
याशिवाय यंदाच्या हंगामातली पहिली उचल म्हणून २ हजार ५०० रुपये मिळावेत, तसंच सर्व कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करावेत, शेतकऱ्यांना खाजगी काट्यावरून वजन करून आणायची मुभा मिळावी, देशाला आवश्यक असेल इतकीच साखर निर्मिती करावी आणि उरलेल्या ऊसातून इथेनॉल निर्मिती करावी अशा विविध मागण्या समितीनं ठरावाच्या माध्यमातून केल्या आहेत.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com