महाभारत या दूरदर्शन मालिकेत शकुनी मामा साकारणारे गुफी पेंटल यांचं निधन

Gufi Pental, who played Shakuni Mama in the TV serial Mahabharata, passed away महाभारत या दूरदर्शन मालिकेत शकुनी मामा साकारणारे गुफी पेंटल यांचं निधन हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Gufi Pental, who played Shakuni Mama in the TV serial Mahabharata, passed away

महाभारत या दूरदर्शन मालिकेत शकुनी मामा साकारणारे गुफी पेंटल यांचं निधनGufi Pental, who played Shakuni Mama in the TV serial Mahabharata, passed away
महाभारत या दूरदर्शन मालिकेत शकुनी मामा साकारणारे गुफी पेंटल यांचं निधन
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

मुंबई : दूरदर्शनच्या ‘महाभारत’ या लोकप्रिय मालिकेत ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. ३१ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांचं मूळ नाव सरबजीत सिंह पेंटल होतं. १९७५ मध्ये ‘रफू चक्कर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ८० च्या दशकात अनेक चित्रपट आणि मालिकांमधे त्यांनी काम केलं. पण त्यांना खरी ओळख, १९८८ मध्ये बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतून मिळाली. महाभारत मालिकेचे कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी ते इंजीनिअर होते.

महाभारत या मालिकेशिवाय त्यांनी श्री चैतन्य महाप्रभू नावाचा चित्रपटही दिग्दर्शित केला होता.

गुफी यांनी त्यांच्या कारकिर्दीत दिल्लगी (1978), देस परदेस (1978), दावा (1997) आणि सम्राट अँड को. (2014) यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुहाग’ या चित्रपटात त्यांनी अक्षय कुमारच्या काकाची भूमिका साकारली होती.

महाभारताशिवाय त्यांनी ‘भारत के वीर पुत्र- महाराणा प्रताप’, ‘मिसेस कौशिक की पाँच बहुएँ’, ‘कर्मफल दाता शनी’ आणि ‘कर्ण संगिनी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. शेवटचे ते ‘जय कन्हैय्या लाल की’ या मालिकेत झळकले होते.

त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. दरम्यान त्यांना बी.आर. चोप्रा यांच्या महाभारत मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *