गुजरात सरकार राज्यात उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी वेदांत आणि फॉक्सकॉनसोबत सामंजस्य करार

ujarat Govt. signs MoU with Vedanta & Foxconn to set up manufacturing unit in state हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Gujarat Govt. signs MoU with Vedanta & Foxconn to set up manufacturing unit in state

गुजरात सरकार राज्यात उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी वेदांत आणि फॉक्सकॉनसोबत सामंजस्य करार

वेदांता आणि फॉक्सकॉननं गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप

गांधीनगर : गुजरातमधे सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅबचा कारखाना उभारण्यासाठी गुजरात सरकारनं आज वेदांता आणि फॉक्सकॉन या कंपनीशी सामंजस्य करार केला. गांधीनगर येथे आयोजित एका कार्यक्रमात रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. ujarat Govt. signs MoU with Vedanta & Foxconn to set up manufacturing unit in state हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

राज्यात ही सुविधा उभारण्यासाठी दोन्ही कंपन्या १ लाख ५४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितलं. यामुळे राज्यात रोजगाराच्या १ लाख संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. या करारामुळे रोजगारनिर्मितीबरोबरच अर्थव्यस्थेला चालना मिळेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

सेमीकंडक्टरच्या उत्पादनाबाबत भारताची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यातल्या नव्या सरकारवर विश्वास नसल्यानंच वेदांतानं आपला हा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातकडे वळवला असल्याची टीका, शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी १ वर्षात अनेक बैठका घेऊन हा प्रकल्प पुण्याजवळ व्हावा, यासाठी आम्ही काम करत होतो. ते नवं सरकार पुढं नेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तो गुजरातकडे गेल्याच्या वृत्तामुळे धक्का बसला, असं त्यांनी म्हटलंय.

नव्या सरकारनं कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखावी आणि मोठे उद्योग आपल्या राज्यात आणण्याचा प्रयत्न करावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. गुजरातनं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तोंडचा घास हिरावून घेतला असल्याची टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही केली आहे. राज्यातल्या तरुणांचा हक्काचा रोजगार गमावल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांची माफी मागतील का असा सवाल त्यांनी केला.

तर, महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुजरातपेक्षा चांगलं पॅकेज देण्यात कमी का पडलो याचं उत्तर आदित्य ठाकरे आणि जयंत पाटील यांनी आधी द्यावं, असं प्रत्युत्तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.  प्रकल्प गुजरातला गेल्याचे आम्हालाही दु:ख आहे. पण, निराश असलो तरी खचलो नाही. आम्ही सेमिकंटक्टर क्षेत्रातील अन्य कंपन्यांशी चर्चा करू आणि त्यांना महाराष्ट्रात आणू. गेल्या अडीच वर्षांपेक्षा अधिक चांगल्या उंचीवर महाराष्ट्राला निश्चितपणे नेऊ, असं सामंत यांनी म्हटलं आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *