ग्वाल्हेर- मुंबई- ग्वाल्हेर अशा थेट विमानसेवेचे उद्घाटन

Jyotiraditya-Scindia Minister of Civil Aviation. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Union Civil Aviation Minister Jyotiraditya Scindia inaugurated the Gwalior-Mumbai-Gwalior direct flight service.

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केले ग्वाल्हेर- मुंबई- ग्वाल्हेर अशा थेट विमानसेवेचे उद्घाटन

इंडिगो कंपनी आठवड्यातून चार वेळा या मार्गावरून विमान उड्डाणसेवा देणार

नवीन विमानसेवेमुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक शहर ग्वाल्हेर हवाई मार्गाने जोडले गेले.

नवी दिल्‍ली : नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज मुंबई ते ग्वाल्हेर थेट विमान मार्गाचे उद्घाटन केले. या नवीन सेवेमुळे या दोन शहरांमधील संपर्क वाढेल तसेच त्यांच्यातील व्यापार, वाणिज्य आणि पर्यटनाला चालना मिळेल.Jyotiraditya-Scindia Minister of Civil Aviation. नागरी विमान वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि इतिहास आणि संस्कृतीचे भांडार असलेल्या ग्वाल्हेर दरम्यान हवाई संपर्क सुरू करणे हे देशाच्या कानाकोपऱ्याला हवाई सेवेद्वारे जोडण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे, असे सिंधिया यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले.

औद्योगिकीकरणाचे केंद्र म्हणून ग्वाल्हेरचा उदय होण्याची वाढती शक्यता असल्याचे सिंधिया यांनी सांगितले. नवीन हवाई मार्गामुळे नागरिकांच्या वेळेची बचत करणारा पर्यायी प्रवासी मार्ग उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. हा मार्ग रोजगार आणि उद्योजकतेच्या नवीन संधींना प्रोत्साहन देईल, असेही ते म्हणाले.

ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या प्रयत्नांमुळे देशातील नागरी विमान वाहतूक सुविधांमध्ये वाढ झाली आहे, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील विमानतळांची संख्या वाढत असून विमानतळांच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात येत आहे, असेही तोमर म्हणाले. ग्वाल्हेर विमानतळाची निर्मितीही नव्या पद्धतीने होणे ही सर्वांसाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

ग्वाल्हेर आणि मुंबई दरम्यान नवीन उड्डाणे सुरू झाल्यामुळे ग्वाल्हेरच्या विकासाला आणि दोन्ही शहरांमधील व्यावसायिक संबंधांना चालना मिळेल, असे त्यांनी पुढे सांगितले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *