हडपसरचा अद्वितीय मोटोक्रॉस रायडर

Hitesh Ghadge Motocross Rider

Hadapsar’s unique motocross rider

हडपसरचा अद्वितीय मोटोक्रॉस रायडर-हितेश घाडगे

भारतात, स्कूटरपेक्षा मोटारसायकल अधिक लोकप्रिय आहेत. रोमांच (Thrill) ताकद (Power) आणि वेगामुळे (Speed) नेहमीच मोटरसायकलला प्राधान्य देण्यात येते. आजकाल स्कूटर्सही हाताळण्यास सोपी असल्यानेHitesh Ghadge Rider मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात ,पण जी मजा  मोटर बाईक चालवण्या मध्ये आहे ती स्कूटर्स मध्ये नक्कीच नाही.  तुम्हाला स्कूटरचालवताना, मोटारसायकल सारखी पॉवर, थ्रिल आणि स्पीड  याची मजा घेता येत नाही.

1980 च्या दशकात आपल्याकडे  मोटारसायकल मध्ये रॉयल एनफिल्ड (बुलेट), येझदी आणि राजदूत  असे काही पर्याय होते. 1982 मध्ये भारतात प्रथमच 100 सीसी बाईक Ind-Suzuki लाँच केली,  भारतातील TVS मोटर आणि जपानची  सुझुकी Suzuki यांनी संयुक्तपणे ही  बाईक भारतात लाँच केली 

 Ind-Suzuki लाँच केल्यानंतर त्या पाठोपाठ Hero Honda, Kawasaki Bajaj आणि Escorts Yamaha यांनी त्यांच्या बाइक्स लाँच केल्या. या सर्व 100 सीसी मोटारसायकल होत्या. फक्त Hero Honda 4 स्ट्रोक होती बाकी सर्व 2 स्ट्रोक होत्या, ज्या  भारतीय खरेदीदाराच्या मानसिकतेचा विचार करून किफायतशीर बनविल्या होत्या. यामुळे भारतीय मोटार सायकल बाजारापेठेचा  चेहरा मोहरा बदलला.

आज पॉवर आणि स्पीडच्या बाबतीत  आपल्याकडे मोटरसायकलमध्ये अनेक पर्याय आहेत. 100 सीसी ते 650 सीसी आणि अधिक पॉवरच्या भारतीय आणि परदेशी बनावटीच्या बाइक्स आता सहज उपलब्ध आहेत.

स्पीड, पॉवर आणि थ्रिल नेहमीच राईडर्सना  बाइक चालवायला प्रोत्साहित करतात. पण  रस्त्यावर आपण जास्त वेगाने मोटरसायकल चालवू शकत नाही. त्या साठी एकच पर्याय डर्ट ट्रॅक  आणि  मोटोक्रॉस स्पर्धा. 

मला आठवतंय साधारण १९८३-८५ दरम्यान हडपसरला तुकाई टेकडीच्या नैसर्गिर्क ट्रॅक (उतारावरील शेतातल्या बांधा मुळे तयार झालेले चढ उतार) वर मोटोक्रॉस स्पर्धा भरवण्यात येत होत्या. 

Hitesh Ghadge Motocross Riderह्या स्पर्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या काही स्पर्धक हडपसरच्या रफिक मामा च्या गॅरेज मधून खास तयार  करून घेत.  या स्पर्धेत बजाज सुपर आणि M50 सुद्धा असायच्या, 150cc, 100cc, 50cc , १९८३-८५ नंतर काळात Honda CD, Yamaha RX आणि Suzuki सारख्या 100cc गाड्या आल्या. 

मातीच्या ट्रॅकवरून उंच हवेत उडालेल्या गाड्या बघायला मजा येत असे. ह्या स्पर्धेत वेग, वळणावर गाडीचा कंट्रोल,  गाड्या गेल्यानंतर उडालेला धुराळा, गाड्यांचे येणारे आवाज हे अवर्णनीय होत. त्या काळी आज सारखी TV  चॅनल्स किंवा शूट करण्यासाठी मोबाईल सुद्धा  नव्हते. 

पुण्यामध्ये Pune Automotive Racing Association ( PARA) पण अश्या प्रकारच्या स्पर्धा नेहरू स्टेडियम वर भरवत असत. श्याम कोठारी, प्रताप भागवत,  अशोक राजा, ज्ञानेश्वर बारगुजे, देशपांडे बंधू  हे त्या काळचे  नावाजलेले रायडर्स होते.  उर्वशी पाटोळे आणि ऐश्वर्या बारगुजे ही महिला वर्गातील प्रमुख नावे होती.  स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेचे फोटो आणि वर्णन वर्तमान पत्रामध्ये येत असे, तेवढीच काय ती प्रसिद्धी. 

पण आज भारतामध्ये दिवसेंदिवस डर्ट ट्रॅक रेसिंग लोकप्रिय होत आहे. मोटोक्रॉस आणि डर्ट ट्रॅक भारतात सहा दशकांहून अधिक काळ अस्तित्वात आहेत. गेल्या 5-6 वर्षांपासून ते अधिक लोकप्रिय झाले आणि देशभरात त्याची आवड निर्माण झाली. तरीसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात या खेळाला प्रसिद्धी दिली जात नाही. 

आता आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील भारतातील रॅली आणि रोड रेसिंग इव्हेंटमध्ये सहभागी होतात.  येणाऱ्या काळात मोटरस्पोर्टमध्ये भारताची भूमिका मोठी होत राहील. वाहन उत्पादक या खेळात पैसे गुंतवत आहेत, विविध प्रकारचे उत्पादक अशा स्पर्धाचे प्रयोजक  होत आहेत.  

बरेच हौशी बाइकर्स आहेत जे साप्ताहिक किंवा मासिक बाइक रॅली आणि राइड्ससाठी क्लबमध्ये सामील होतात. आज देशातील अनेक तरुण रायडर्स व्यावसायिक रायडर बनण्याची आकांक्षा बाळगत आहेत.  

हे सगळं मी कशा साठी सांगतोय?  कारण, अशाच एका उदयोन्मुख रायडरची माझी नुकतीच गाठ पडली. 

तरुण होतकरू डर्ट ट्रॅक आणि मोटोक्रॉस रायडर म्हणून तो उदयास येत आहे. 

त्याच नाव हितेश घाडगे,  हडपसर, पुणे येथील,  डर्ट ट्रॅक आणि मोटोक्रॉस रायडर्सपैकी एक.  कोरोनाच्या काही काळ आधी मी त्याला माळवाडी हडपसरला डी पी रोड जवळ झालेल्या स्पर्धेत बाधितलं होत. ह्याच्याशी गप्पा मारण्याचे कारण, या मुळे नवीन उदयन्मुख रायडर्स ना काही उपयोगी माहिती , टिप्स आणि प्रेरणा मिळेल. 

मोटोक्रॉस आणि डर्ट ट्रॅक मध्ये श्रीगणेशा . Hadapsar's unique motocross rider Hitesh Ghadge

हितेशने वयाच्या 25 व्या वर्षी डर्ट ट्रॅक आणि मोटोक्रॉस रायडिंगला सुरुवात केली,  तो त्याच्या लहानपणापासून त्याच्या  घराजवळील गॅरेजमध्ये डर्ट ट्रॅक बाइक्स बघायचा.  वयाच्या १६ व्या वर्षी जवळच्या मैदानावर त्याने बाईक चालवायला शिकायला सुरुवात केली. परवाना ( Driving License)  मिळाल्यानंतर, घराजवळील गॅरेजमध्ये तो जायचो जिथे डर्ट ट्रॅक बाइक्सची देखभाल केली जाते किंवा रॅली किंवा डर्ट ट्रॅकसाठी  मोटोर सायकल ट्यून केल्या जात असे. 

पुढे, तो  रफिक मामानं (गॅरेज मालक) बाइक्स गॅरेज वरून  सराव मैदानावर नेण्यासाठी मदत करायचा  जेणेकरून त्या चालवण्याची संधी मिळेल. यातूनच त्याला या खेळाची आवड निर्माण झाली. 

रॉयल एनफिल्डचा जगातील सर्वात मोठा मेळावा म्हणून ओळखला जाणारा रायडर मॅनिया, हा तीन दिवसांचा कार्यक्रम , ज्यामध्ये राइडिंग इव्हेंट्स आणि स्पर्धा, डर्ट-ट्रॅक रेसिंग, बाईक संबंधित स्टॉल्स आणि संगीत, मनोरंजन आणि कला यासह रॉयल एनफिल्ड आणि बाईकचे शौकीन देशभरातून त्यांच्या बाईकचा आनंद घेण्यासाठी आणि समविचारी लोकांसोबत त्यांची आवड शेअर करण्यासाठी गोव्यात येतात.

अशाच ऐका स्पर्धेत अननुभवी हितेश ने भाग घेतला, ह्या स्पर्धेत रफिक मामांनी त्याची गुणवत्ता हेरली आणि त्याला प्रोफेशनल रायडर होण्यास उत्तेजन दिले. हडपसर येथे त्याचा छोटेखानी कार्यक्रम करून सत्कार केला.

स्पर्धेसाठी रफिक मामांनी गाडी ट्यून करून देणार यास होकार दिल्यानंतर, त्याने डर्ट ट्रॅकचे प्रशिक्षण सुरू केले.

हितेश  ब्लिट्जक्रेग रायडिंग क्लबच्या  15 ऑगस्ट 2015 रोजीच्या  डर्ट ट्रॅक इव्हेंट मध्ये सहभागी झाला,  त्या दिवशी त्याने पहिल्यांदा बुलेट इलेक्ट्रा 350 ( Bullet Electra 350) चालवली आणि त्या दिवशी पहिला पोडियम जिंकला. 

त्यानंतर, त्याने गुरु रफिक मामा यांचा सल्ला मानला आणि  FMSCI ( Federation of Motor Sports Clubs of India) फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया सारख्या व्यावसायिक शर्यतींमध्ये मोटरसायकल स्पर्धेमध्ये भाग घेत गेला आणि  त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि  वेळो वेळी देलेल्या  सल्ल्यामुळे विजेतेपदही जिंकले. 

 हडपसर भागात सरावासाठी मैदान मिळणे खरोखर अवघड आहे. पण त्यावर ही त्याने उपाय शोधला, नेहमीच्या सरावासाठी तो  होळकरवाडी आणि कानिफनाथ घाटावर जातो, या ठिकाणी काही नैसर्गिक  ट्रॅक आहेत जे  स्पर्धे मध्ये असलेल्या  डर्ट ट्रॅक (Dirt Track) सारखे आहेत. गावकऱ्यांनी सुद्धा त्याला  इथे सराव करायला परवानगी दिली. त्यामुळे नियमित सराव आणि प्रशिक्षणासाठी तो याच  ठिकणी जातो.

त्याच्याकडील बाइक्सHadapsar's unique motocross rider Hitesh Ghadge

हितेश कडे 6 वेगवेगळ्या बाइक्स आहेत, 3 Royal Enfield, दोन Hero Impulse आणि एक Yamaha Rx 135. ज्या मी रेसिंगसाठी वापरतो.  रॉयल एनफिल्ड  (RE) ही त्याची सर्वात आवडती बाईक, त्या व्यतिरिक्त त्याला हिरो इम्पल्स  सुद्धा आवडते

  1. Royal Enfield Electra 350 CC
  2. Royal Enfield Standard 500 Cc
  3. रॉयल एनफिल्ड हिमालयन
  4. यामाहा RX 135
  5. हिरो इम्पल्स स्टॉक
  6. हिरो इम्पल्स रेसिंग

या  बाइक्स  वापरण्याचे कारण त्या भारतीय बनावटीच्या आहेत, त्यामुळे सुटे भाग सहज उपलब्ध होतात  दुसरे कारण म्हणजे त्याची उंची लक्षात घेता  या बाइकची सीटची उंची त्याच्या साठी  योग्य आहे.  या बाईकचा इतर बाईकपेक्षा कमी मेंटेनन्स आहे. 

डर्ट ट्रॅक आणि मोटोक्रॉस साठी तो त्याच्या गरजेनुसार बदल करून घेतो, त्यामुळे बाईक सहज आणि आरामात चालवता येते.  डर्ट  ट्रॅक किंवा मोटोक्रॉस साठी तो त्याच्या बाईक वरील अनावश्यक पार्टस काढतो, ज्या मुळे बाईक आवश्यक वेगामध्ये सहज चालवता येते.  

त्याचे गुरु ( सल्लगार)

त्याचे गुरु रफिक मामा आणि जतीन भापकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून रेसिंग  ट्रॅक आणि परिस्थिनुसार बाईक  ट्यून करायला सांगितली, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला.

फिटनेससाठी तो नियमित व्यायाम करतो . कोणत्याही खेळासाठी तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. तो रोज पहाटे ४.३० वाजता उठतो,  सायकलिंग किमान 25 किमी किंवा 5 ते 7 किमी धावणे आणि 5 किमी चालणे, काही व्यायाम, व्यायामशाळेत  गरजेनुसार ही त्याची दिनचर्या. 

त्यावेळी कोणत्याही  स्पर्धा नसतात त्यावेळी तो यशस्वी खेळाडूंच्या यशोगाथा वाचतो तसेच  YouTube वर वेगवेगळ्या  क्रीडा प्रकारातील यशस्वी  व्यक्तींच्या मुलाखती पाहतो. याचबरोबर आंतरराष्ट्रीय रॅलींचे रेसिंग व्हिडिओ आणि डर्ट ट्रॅक इव्हेंट्स देखील पाहतो. 

तो त्याचे  रेसिंग व्हिडिओ देखील पाहतो जिथे त्याने  शर्यतींमधील केलेल्या  चुका पाहतो, जेणेकरून तो भविष्यात त्याच चुका टाळू शकेन. 

हितेशच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदच क्षण ‘रॅली ऑफ हिमालय’  मध्ये  रॉयल एनफिल्ड श्रेणी गट ‘डी’ चे विजेतेपद मिळवले होते तो होता. ही रॅली मनाली, हम्ता पास, सोलांग व्हॅली, ग्रम्फू, बटाल आणि काझा या मार्गे निघते. या रॅली मध्ये कौशल्य पणाला लागते. त्याच बरोबर तुमचे प्रशिक्षण आणि शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती. 

ही शर्यत प्रत्येक रायडरसाठी अतिशय खडतर आणि आव्हानात्मक होती. रॅली एकाच तुकड्यात पूर्ण करण्याचे प्रत्येकाचे स्वप्नअसते, ही माझी पहिली क्रॉस कंट्री रॅली होती आणि मी ती पहिल्या प्रयत्नांत मी  यशस्वीरित्या पूर्ण केली आहे असं हितेशने सांगितलं. 

आत्तापर्यंत हितेशने  100 हून अधिक ट्रॉफी जिंकल्या आहेत, त्यापैकी 20+ राष्ट्रीय चॅम्पियनशिप विविध श्रेणींमध्ये आहेत. 

त्याचा सल्ला

 त्याला  असे वाटते की दिवसेंदिवस सतत केलेले प्रयत्न आणि सराव यामुळे  तो एक उत्तम  अष्टपैलू  रायडर बनला  आणि त्या मुळे  विविध चॅम्पियनशिप जिंकण्यात त्याला  मदत झाली, याशिवाय तो त्याच्या भूतकाळातील चुकांमधूनही शिकला. 

त्याला असं वाटत  ज्याला डर्ट ट्रॅक रायडिंगमध्ये करिअर करायचे आहे  शारीरिक तंदुरुस्ती व्यतिरिक्त, बाइक हाताळण्यासाठी रायडरला त्याची फिटनेस पूर्ण करावी लागते. 

रायडरला त्याची बाईक हाताळण्यासाठी आधी ऑफ-रोड राईड करावी लागते. FMSCI च्या नियमानुसार त्याला त्याची बाईक तयार करावी लागेल. डर्ट ट्रॅक किंवा रॅली रेससाठी संपूर्ण संरक्षण गीअर्स असणे आवश्यक आहे. FMSCI कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी रायडरला FMSCI परवाना मिळणे आवश्यक आहे. 

ग्रॅबिंग स्टाइल, राइडिंग पोस्चर यासाठी त्यांना भरपूर प्रशिक्षण/सराव असणे आवश्यक आहे, राइडिंगच्या वेगवेगळ्या शैली आहेत.  आपल्या आरामदायी राइडिंगसाठी त्यामुधन योग्य निवड करणे आवश्यक आहे.

रॅलीच्या बाबतीत नकाशे आणि नेव्हिगेशनचे ज्ञान असणे आवश्यक आहे, आपल्याकडे रॅलीमध्ये समान ट्रॅक नाहीत, त्यामुळे पुढे काय होणार आहे, हे आपल्याला माहित नसते, सतत ट्रॅकवर लक्ष ठेवले पाहिजे.  वेग राखणे तसेच बाईक हाताळणे खूप अवघड आहे. 

रॅली आणि डर्ट ट्रॅकसाठी बॉडी पोझिशन आणि राइडिंग स्टाइल वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला जी बॉडी पोझिशन आणि राइडिंग स्टाइल सोईस्कर, सहज आणि स्पर्धेमध्ये आरामदायी वाटेल अशी असावी. 

त्याचे मोटोक्रॉस अँड डर्ट ट्रॅक मधील आवडते हिरो.

डर्ट ट्रॅक रेसिंगमधील पिंकेश ठक्करला त्याचा आयडॉल मानतो, जो 22 वर्षांहून अधिक रेसिंगसह 2018 चा नॅशनल रॅली चॅम्पियन आहे. याचबरोबर सी एस संतोष जो भारतीय ऑफ-रोड आणि एंड्युरो मोटरसायकल रेसर आहे, तो त्याचा स्पोर्ट्स हिरो आहे.

हितेशला त्याच्या मोटोक्रॉस आणि डर्ट ट्रॅकच्या  कारकिर्दीसाठी  शुभेच्छा !

 

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा 
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *