देशभरात एक लाख आयुष्मान भारत आरोग्य आणि वेलनेस केंद्रांवर आरोग्य मेळ्याचं आयोजन

Organizing health fairs at one lakh Ayushman Bharat health and wellness centers across the country

देशभरात एक लाख आयुष्मान भारत आरोग्य आणि वेलनेस केंद्रांवर आरोग्य मेळ्याचं आयोजन

नवी दिल्ली : आरोग्य मंत्रालयातर्फे देशभरातल्या एक लाख आयुष्मान भारत आरोग्य आणि वेलनेस केंद्रांवर गटनिहाय आरोग्य मेळ्याचं आयोजन आजपासून करण्यात येत आहे.

Dr Mansukh Mandaviya
File Photo

सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेश, तसंच केंद्रसरकारच्या महिला आणि बालविकास, माहिती आणि प्रसारण, पंचायत राज, आयुष, आरोग्य, त्याचप्रमाणे शिक्षण मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम होत आहे.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त आठवडाभर साजऱ्या केल्या जाणाऱ्या या आरोग्य मेळ्यात आयुष्मान भारत आरोग्य आणि वेलनेस केंद्र तसंच दूरध्वनीद्वारे दिल्या जाणारा वैद्यकीय सल्ला आणि औषध मार्गदर्शन

सुविधेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मदत करेल असं आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी  सांगितलं.
Hadapsar News Bureau.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *