Hearing on the power struggle in the state in the Constitution Bench on September 27
राज्यातल्या सत्तासंघर्षावर घटनापीठात २७ सप्टेंबरला सुनावणी
नवी दिल्ली : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत घटनापीठापुढची सुनावणी आता येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला मनाई करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अंतरिम याचिकेची सुनावणी आज पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली.
या प्रकरणाची दखल घेतली असता, शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी भारत निवडणूक आयोगाला (ECI ) निर्णय घेण्यापासून रोखता येणार नाही, अशी भूमिका मांडली.
वरिष्ठ वकिलांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची निकडही नमूद केली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की तत्कालीन CJI NV रमना यांच्या नेतृत्वाखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने ECI विरुद्ध कोणताही स्थगिती आदेश दिला नव्हता.
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरली, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंव्ह यांनी दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर २७ सप्टेंबर ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com