राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी

Rain with gale force winds at many places in the state राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Heavy rainfall in various parts of the state

राज्याच्या विविध भागात पावसाची दमदार हजेरी

मुंबई : मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगराला काल  पावसानं झोडपून काढलं.मुसळधार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं होतं. त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र पाण्याचा उपसा झाल्यामुळे त्या भागातली वाहतूक पूर्ववत झाली.Rain with gale force winds at many places in the state राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

उपनगरी रेल्वे सेवा सुरळीत असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.मुंबईला पाणी पुरविणारे सातही तलाव भरले असून सर्व तलावांमध्ये 99 पूर्णांक 32 शतांश टक्के जलसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती पालिकेच्या जल अभियंता विभागानं दिली आहे.

पुणे आणि परिसरातही काल पावसाची संततधार होती. या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यातील आमडे इथं एकजण काल पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याचं वृत्त आहे. पवना धरणातूनही काल  दुपारपासून विसर्ग सुरू करण्यात आला असून नदी काठच्या रहीवाशांनी सतर्क राहण्याचं  आवाहन प्रकल्पाचे उप अभियंता अशोक शेट्ये यांनी केलं आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे काल सकाळी गंगापूर धरणातून 6,741 क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला.
गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 95 टक्के भरलं आहे.

जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातूनही विसर्ग सुरू आहे.कोयना धरणाच्या क्षेत्रात पाऊस वाढल्याने काल सकाळी कोयना धरणाचे 6 वक्रदरवाजे दीड फूट उचलून साडेचार फुटावर नेण्यात आले. सध्या पायथा विद्युत गृहामधून 1050 क्युसेक विसर्ग सुरू आहे. वक्र दरवाजे उचलल्याने नदीपात्रात  41 हजार 9 शे 58 क्युसेक विसर्ग होणार आहे. याचबरोबर धोम धरणातूनही  कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे कोयना आणि कृष्णा काठावरीलल गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *