राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर Heavy rains in many places in the state हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Heavy to very heavy rains are expected in Konkan, Central Maharashtra and Marathwada till July 8

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री पासून संततधार पाऊस आहे. कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वेंगुर्ला, वैभववाडी तालुक्यात जोरंदार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर Heavy rains in many places in the state हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News Hadapsar News

माणगाव खोऱ्यात आंबेरी पुलावर पाणी आल्यानं काही गावांचा संपर्क तुटला आहे. सावंतवडी तालुक्यात तळवडे इथं बाजारपेठेत पावसाचं पाणी आलं असून सावंतवाडी- वेंगुर्ले मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान पावसाने जोर धरल्यानं शेतकरी सुखावला आहे. शेतीच्या कामांनी जिल्ह्यात वेग पकडला आहे.

नांदेड शहरात काल रात्री पावसाची रिपरिप सुरू आहे. हदगाव तालुक्यातल्या उंचेगाव, वाकी, जगापुर आदि गावात काल दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वाशिम शहर आणि परिसरात काल रात्री पासून रिमझिम पाऊस सुरू असून मालेगाव तालुक्यात ही सर्वत्र पाऊस झाला, जिल्ह्यातल्या बहुतांश ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे.अकोल्यात सकाळपासून अधूनमधून रिमझिम पाऊस पडत असून ढगाळ वातावरण आहे.

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे.

उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच दि. 5 जुलै रोजी मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील काही भागात 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळ वारा व वीजेच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस तर दि. 6 व 7 जुलै दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मच्छीमारांनीही पुढील चार दिवस महाराष्ट्र-गोवा सागरी किनाऱ्यावर जाऊ नये, अशा सूचना प्रादेशिक हवामान विभागाने दिल्या आहेत. मालवण ते वसई सागरी किनाऱ्यावर आज दि. 4 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत 3.5 ते 4.8 मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

2 Comments on “राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *