Help Desk’ of ‘Avishkar’ is active in the University
‘आविष्कार’चा ‘हेल्प डेस्क’ विद्यापीठात ॲक्टिव्ह
क्यू आर कोड’ स्कॅन करून ‘आविष्कार’ मध्ये प्रवेश करा
आविष्कार’ संमेलनासाठी आवश्यक सुविधांविषयीची माहिती एका ‘क्यू आर कोड’च्या क्लिकवर उपलब्ध
पुणे: स्व. प्रा. एम. आर. भिडे आविष्कार नगरी, खाशाबा जाधव क्रीडा संकुल : राज्यस्तरीय ‘आविष्कार’ संमेलनासाठी येणाऱ्या पुण्याबाहेरील पाहुण्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कंबर कसली आहे. विद्यापीठाने त्यासाठी उभारलेला ‘हेल्प डेस्क’ अगदी पहिल्या दिवसापासूनच ॲक्टिव्ह झाला आहे
15 व्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय संशोधन संम्मेलन ‘आविष्कार 2023’च्या यजमानपदाचा मान यंदा पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. विद्यापीठाच्या आवारात गुरुवारी या संमेलनाचा शुभारंभ झाला.
त्यासाठी विद्यापीठाने उभारलेल्या ‘हेल्प डेस्क’ने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्या आधारे विद्यापीठाने सर्व सहभागींना आवश्यक सुविधांविषयीची माहिती एका ‘क्यू आर कोड’च्या क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे.
उपक्रमासाठीच्या ओळखपत्रापाठीमागे हा क्यूआर कोड दिलेला आहे. तो स्कॅन करताच उघडणाऱ्या लिंकवर गूगल मॅप गाईड उघडते. त्यावर विद्यापीठातील सर्व महत्वपूर्ण ठिकाणांची यादी दिली आहे. स्पर्धेचे ठिकाण, राहण्याची व्यवस्था, सादरीकरणाचे स्थळ, कॅन्टीन, आरोग्य सुविधा ई. गोष्टी या मॅपवर दिल्या आहेत. त्याचसोबत सर्व समन्वयकांचे आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांकही या लिंकवर दिले आहेत.
विद्यापीठाच्या आयटी सेलचे संचालक प्रा. नितीन पाटील, प्रा. स्मिता कांदेकर यांनी हा क्यूआर कोड बनवण्याची जबाबदारी पूर्ण केली. विद्यापीठाच्याच भूगोल विभागातील संशोधक विद्यार्थी योगेश बडे यांनी मॅप गाईड तयार केले. डॉ. रवी आहुजा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य एकत्रितपणे हेल्प डेस्कच्या माध्यमातून सर्व सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांपर्यंत पोहोचविले जात असल्याची माहिती कांदेकर यांनी गुरुवारी दिली.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com