Inauguration of Hindu Rhudya Samrat Balasaheb Thackeray Planetarium by Chief Minister Eknath Shinde
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
रत्नागिरी : रत्नागिरीत सांस्कृतिक आणि वैज्ञानिक केंद्र ठरणाऱ्या श्रीमान हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
माळनाका परिसरात असलेल्या या तारांगणाच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, योगेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
त्रिमीती प्रक्षेपण व्यवस्था या तारांगणात आहे. याच्या बांधकामास ११ कोटी ५८ लाख खर्चून हे उभारण्यात आले आहे. मुख्यमंत्रंनी फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन याचे लोकार्पण केले.
इन्फोव्हीजन टेक्नॉलॉजीने याची उभारणी केली आहे. यात व्हिमिती व त्रिमीती प्रक्षेपणाची सोय आहे. देशातील या स्वरुपाचे पाचवे डिजीटल तारांगण रत्नागिरीत आकारास आले आहे. याच्या स्थापत्य कामावर ५ कोटी ६८ लाख रुपये खर्च आला असून अद्ययावत प्रक्षेपण यंत्रणा व वातानुकूलीत सभागृह आणि प्रक्षेपण साहित्य यासाठी ५ कोटी ९० लाख रुपये खर्च आला आहे.
याच ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात ०१ कोटी ६२ लाख ८५ हजार रुपये खर्चून विज्ञान गॅलरी व ८० लाख ७६ हजार रुपये खर्च करुन कला दालन उभारण्यात येणार आहे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com