जी-२० परिषदेच्या निमित्तानं औरंगाबाद जिल्ह्याचं ऐतिहासिक, सांस्कृतिक दर्शन जगाला घडणार

G20 summit 2023 G20 परिषद २०२३ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

On the occasion of the G-20 conference, the historical and cultural vision of the Aurangabad district will be presented to the world

जी-२० परिषदेच्या निमित्तानं औरंगाबाद जिल्ह्याचं ऐतिहासिक, सांस्कृतिक दर्शन जगाला घडणार

औरंगाबाद: भारत, इटली आणि इंडोनेशिया हे तीन देश जी-२० परिषदेचं आयोजन करणार आहेत. त्या अनुषंगाने १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी औरंगाबाद इथं होणारी जी-२० परिषद ‘महिला आणि बालकल्याण’ या विषयावर आधारित आहे.G20 summit 2023 G20 परिषद २०२३ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

या परिषदेच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्याचं ऐतिहासिक, सांस्कृतिक तसंच औद्योगिक दर्शन जगाला घडवण्याची संधी मिळणार असून, प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून ही परिषद यशस्वी करण्याचं आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी औरंगाबाद इथं केलं.

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-२० शिखर परिषदेच्या नियोजनाची आढावा बैठक घेण्यात आली तेव्हा ते बोलत होते. कराड पुढं म्हणाले की, जी-२० परिषदेचं आयोजन केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयानं करण्यात येणार असून, यासाठी राज्य शासनानं ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

या परिषदेत एकूण २० विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार असून, आठ विषय हे अर्थ विषयक तर इतर १२ मुद्द्यामध्ये औद्योगिक, उद्योग, व्यापार, पर्यटन, आदी विषयांवर परिषदेचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *