विविध राज्यांच्या गृहममंत्र्यांचं आजपासून दोन दिवस सूरजकुंड इथं चिंतन शिबीर

Union Home Minister Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

HM Amit Shah to preside over 2-day Chintan Shivir of State Home Ministers & LGs at Surajkund,

विविध राज्यांच्या गृहममंत्र्यांचं आजपासून दोन दिवस सूरजकुंड इथं चिंतन शिबीर

पोलीस दलांचे आधुनिकीकरण, सायबर गुन्हे व्यवस्थापन, जमीन सीमा व्यवस्थापन, किनारी सुरक्षा, महिलांची सुरक्षा आणि अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा

Union Home Minister Amit Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,
File Photo

सूरजकंड: महाराष्ट्रासह विविध राज्यांच्या गृहमंत्र्यांचं चिंतन शिबीर आजपासून दोन दिवस हरियाणात सूरजकंड इथं भरविण्यात येणार आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शहा या शिबिराच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या चिंतन शिबिराला दूरस्थ पद्धतीने संबोधित करतील.

सर्व राज्यांचे गृहमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे उप-राज्यपाल आणि प्रशासकांना या दोन दिवसीय चिंतन शिबिरात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. राज्यांचे गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांचे महासंचालकही या चिंतन शिबिरात सहभागी होणार आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात घोषित केलेल्या “व्हिजन २०४७” आणि ‘पंच प्रण’ यांच्या अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणं असा या दोन दिवस चालणाऱ्या चिंतन शिबिराचा मुख्य उद्देश आहे.

चिंतन शिबिर, सहकारी संघराज्यवादाच्या भावनेने, केंद्र आणि राज्य स्तरावरील विविध भागधारकांमध्ये नियोजन आणि समन्वयामध्ये अधिक समन्वय आणण्याचे उद्दिष्ट आहे.

सायबर गुन्हे व्यवस्थापनासाठी परीयंत्रणा विकसित करणं, पोलिस दलांचं आधुनिकीकरण, फौजदारी न्याय व्यवस्थेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं, सीमा व्यवस्थापन, किनारपट्टीची सुरक्षितता तसंच इतर अनेक अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवर या शिबिरात विचारविनिमय होणार आहे.

२०४७ पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘नारी शक्ती’ची भूमिका महत्त्वाची असून महिलांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी निर्भय वातावरण निर्माण करण्यावर यावेळी विशेष भर दिला जाईल. राज्य सरकारांचा सहभाग सुनिश्चित करणं आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘चिंतन शिबिरा’च्या सहा सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *