Homegrown cervical cancer vaccine ready
गर्भाशयाच्या कॅन्सरवरची स्वदेशीनिर्मिती लस तयार
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाने केली ही लस
नवी दिल्ली : देशातील महिलांना होणारा हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. स्तनाचा कर्करोग पहिल्या क्रमांकावर आहे. देशभरात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरनंतर सर्वाधिक संख्या ही सर्व्हायकल कॅन्सरची असते. भारतात गर्भाशयाच्या कँसरग्रस्त (Cancer) महिलांची संख्या जास्त आहे. या आजारामुळे अनेक महिलांचा मृत्यू होतो.
सर्व्हायकल कॅन्सरग्रस्त बहुतांश महिला एडव्हान्स स्टेजला असतानाच उपचारांसाठी डॉक्टरकडे जात असतात. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. अनेकदा रुग्णाचा जीव वाचवणं कठीण होतं.
गर्भाशयाच्या कँसरविरोधातील पहिली स्वदेशी लस भारतीय महिलांना मिळणार आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाने ही लस तयार केली आहे.
देशात तयार करण्यात आलेल्या पहिल्या सर्व्हायकल कॅन्सरवरच्या लशीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्याची घोषणा केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी केली. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेली ही HPV लस सर्वसामान्य भारतीय नागरिकाला परवडणाऱ्या दरात उपलब्ध होईल, असं ते म्हणाले.
महिलांच्या आरोग्यावर आता लक्ष केंद्रीत केल्याची माहिती सीरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. सरकारी आणि खासगी क्षेत्रानं एकत्रितरित्या काम केलं देश स्वयंपूर्ण होऊ शकतो, असं ते म्हणाले.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com